Cyprus
हे नावानेही ओळखले जाते: Chittim
35.0100, 33.2000 गूगल नकाशावर पाहा
Cyprus चा उल्लेख असलेली वचने
सोरविरुद्ध भविष्यवाणी: तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा! कारण सोरचा नाश झाला आहे आणि तिथे घर किंवा बंदर असे काहीच राहिले नाही. कित्तीम देशाकडून हे वचन त्यांच्याकडे आले आहे.
ते म्हणाले, “कुमारिके सीदोन, यापुढे तुझी चैनबाजी चालणार नाही. आता तू चिरडली जावी! “वर कित्तीम पलीकडे गेलात; तर तिथेही तुम्हाला विश्रांती मिळणार नाही.”
समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा, केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा:
त्यांनी तुझी वल्ही बाशानच्या एला झाडाची बनविली; त्यांनी तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातील सुरूच्या लाकडाच्या बनविल्या आणि त्यांना हस्तिदंताने सजविले.
योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते,
स्तेफनाचा वध झाल्यानंतर छळामुळे जे इतरत्र पांगले होते ते प्रवास करीत फेनिके, सायप्रस व अंत्युखिया येथे गेले व त्यांनी केवळ यहूदीयांनाच वचन सांगितले.
तरी, सायप्रस व कुरेने, येथून अंत्युखिया येथे गेलेल्या काही लोकांनी प्रभू येशूंविषयीची शुभवार्ता ग्रीक लोकांनाही सांगितली.
पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले.
याबाबत त्यांचा मतभेद एवढा तीव्र झाला की त्यांनी एकमेकांची सोबत सोडली. बर्णबाने आपल्याबरोबर मार्कला घेतले आणि जहाजात बसून ते सायप्रसला गेले,
जाताना आम्हाला सायप्रस बेट दिसले आणि त्याच्या दक्षिणेकडे जाऊन आम्ही पुढे सीरियातील सोर बंदरात उतरलो, कारण तिथे जहाजातील सामान खाली करावयाचे होते.
कैसरीयातील काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला जिथे राहणार होतो त्या म्नासोनच्या घरी आणले. हा मनुष्य सायप्रसचा असून प्रारंभीच्या शिष्यांपैकी एक होता.
तिथून आम्ही पुन्हा समुद्र प्रवासास निघाल्यावर तोंडासमोर वारा येत असल्यामुळे सायप्रसच्या उत्तरेला असलेले बेट आणि मुख्य भूमी यांच्यामधून गेलो.