Skip to content

John

16 वचने · 1 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Mark, Marcus

John चा उल्लेख असलेली वचने

  1. अबशालोमाने त्याच्या माणसांना आज्ञा केली, “ऐका! जेव्हा अम्नोन द्राक्षारस पिऊन मस्त झालेला असेल आणि मी तुम्हाला सांगेन, ‘अम्नोनावर वार करा,’ तेव्हा त्याला ठार मारा. घाबरू नका. ही आज्ञा मी तुम्हाला केली नाही काय? खंबीर व्हा आणि धैर्य धरा.”

  2. तेव्हा इस्राएलच्या राजाने देशातील वडील लोकांना बोलाविले व म्हटले, “पाहा हा मनुष्य कसा त्रास देऊ इच्छित आहे! त्याने जेव्हा माझ्या स्त्रिया आणि माझी लेकरे, माझी चांदी व सोने मागवून घेतली, मी त्याला नकार दिला नाही.”

  3. माझ्याकडे पाहा आणि भयचकित व्हा; आपल्या मुखावर आपला हात ठेवा.

  4. “हे इय्योबा, लक्ष दे आणि माझे ऐक; तू शांत राहा आणि मी बोलेन.

  5. सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे.

  6. तिची तटबंदी पाहा आणि तिच्यातील राजवाडे न्याहाळून पाहा, म्हणजे तुम्हाला तिचे वर्णन करून तुमच्या पुढील पिढीला सांगता येईल.

  7. हे त्याला स्पष्टपणे समजल्यानंतर, योहान ज्याला मार्क असेही म्हणतात त्याची आई मरीयाच्या घरी गेला. तिथे अनेक लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते.

  8. जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले.

  9. सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता.

  10. आता पौल आणि त्याचे सहकारी यांनी पाफोस शहर सोडले व ते तारवात बसून पंफुल्यातील पेर्गा येथे आले, या ठिकाणी योहानाने त्यांचा निरोप घेतला व तो यरुशलेमला परतला.

  11. बर्णबाला हवे होते की योहान, ज्याला मार्क असेही म्हणत, त्यालाही आपल्याबरोबर न्यावे.

  12. याबाबत त्यांचा मतभेद एवढा तीव्र झाला की त्यांनी एकमेकांची सोबत सोडली. बर्णबाने आपल्याबरोबर मार्कला घेतले आणि जहाजात बसून ते सायप्रसला गेले,

  13. माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा.

  14. केवळ लूकच माझ्याबरोबर आहे. येताना मार्काला घेऊन ये, कारण माझ्या सेवेत तो उपयोगी आहे.

  15. आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात.

  16. जी बाबेलमध्ये आहे ती, तुमच्याबरोबर एकत्र निवडलेली, तुम्हाला तिच्या शुभेच्छा पाठविते आणि माझा पुत्र मार्क तुम्हाला शुभेच्छा पाठवितो.