Cilicia
36.9100, 34.8900 गूगल नकाशावर पाहा
Cilicia चा उल्लेख असलेली वचने
परंतु लिबेर्तिन (असे ज्यास म्हणत होते त्या) सभागृहातील काही सभासद, कुरेनेकर, आलेक्सांद्रेयकर आणि किलिकिया व आशिया प्रदेशातील यहूदी लोक स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.
त्यांनी आपल्याबरोबर नेलेल्या पत्राचा मजकूर असा होता: प्रेषित, वडीलजन आणि बंधुवर्ग यांच्याकडून, अंत्युखिया, सिरिया व किलिकिया येथील गैरयहूदी विश्वासणार्यांना: सलाम.
तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.
पौलाने उत्तर दिले, “मी यहूदी आहे व किलिकियातील तार्सस शहराचा नागरिक असून, माझे शहर सर्वसामान्य नाही. कृपा करून या लोकांबरोबर मला बोलू द्यावे.”
“मी एक यहूदी आहे आणि माझा जन्म किलिकियामधील तार्सस शहरात झाला, परंतु मी या शहरात वाढलो. माझे शिक्षण गमालियेलच्या मार्गदर्शनात झाले व आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राचे सविस्तर प्रशिक्षण मला मिळाले. जसे तुम्ही आज परमेश्वराविषयी आवेशी आहात तसाच मीही होतो.
राज्यपालांनी पत्र वाचले आणि तो कोणत्या प्रांताचा आहे, असे विचारले. तो किलिकियाचा आहे, असे त्यास समजल्यावर,
आम्ही समुद्राची यात्रा करून किलिकिया व पंफुल्या या प्रांतांच्या किनार्याने जाऊन लुक्यातील मूर्या येथे जाऊन पोहोचलो.
नंतर मी सिरिया आणि किलिकिया येथे गेलो.