मुख्य मजकुरावर जा

Priests बद्दल बायबलमधील वचने: No blemished or defective persons could be consecrated

7 वचने · 86 पैलू

No blemished or defective persons could be consecrated बद्दल वचने

  1. “अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये.

  2. एखादा मनुष्य आंधळा, लंगडा, चपट्या नाकाचा, हातापायांना अधिक बोटे असलेला;

  3. ज्याचा पाय किंवा हात तुटलेला आहे,

  4. कुबडा, ठेंगणा, डोळ्यात कमतरता असलेला, त्वचेचे रोग असलेला व भग्नांड असून

  5. तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये.

  6. तरी त्याच्या परमेश्वराचे परमपवित्र अन्न व पवित्र अन्न तो खाऊ शकतो;

  7. पण त्याला शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने पडद्यामागील परमपवित्रस्थानात किंवा वेदीजवळही जाऊ नये, त्याने तसे केल्यास, माझे पवित्रस्थान भ्रष्ट होईल, कारण त्यांना पवित्र करणारा मीच याहवेह आहे.’ ”