मुख्य मजकुरावर जा

Priests बद्दल बायबलमधील वचने: While unclean could not eat of the holy things

5 वचने · 86 पैलू

While unclean could not eat of the holy things बद्दल वचने

  1. “त्यांना सांग: ‘आतापासून पुढे पिढ्यान् पिढ्या जो कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी याहवेहसाठी आणलेल्या पवित्र अर्पणांना स्पर्श करेल, त्याचा माझ्या समक्षतेपासून उच्छेद करावा; मी याहवेह आहे.

  2. “ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,

  3. किंवा जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अशुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल.

  4. अशा कोणालाही त्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि पाण्याने स्नान केल्याशिवाय पवित्र अर्पणांतील अन्न खाऊ नये.

  5. सूर्य मावळल्यानंतर तो पुन्हा शुद्ध ठरेल व तेव्हाच त्याने पवित्र अन्न खावे, कारण तेच त्याचे अन्न आहे.