Skip to content

Place

19 verses

Place चा उल्लेख असलेली वचने

  1. पडदा आकड्यांवर टांगावा आणि कराराचा कोश पडद्यामागे ठेवावा. हा पडदा पवित्रस्थान व परमपवित्रस्थानाची साक्ष वेगळी करेल.

  2. “अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल.

  3. अहरोनाने तो झगा सेवा करीत असताना घालावा. जेव्हा तो याहवेहसमोर पवित्रस्थानात जातो व बाहेर येतो त्यावेळी घंट्यांचा आवाज ऐकू येईल, म्हणजे तो मरणार नाही.

  4. अहरोन व त्याचे पुत्र ज्यावेळी सभामंडपात येतील किंवा सेवेसाठी वेदीकडे पवित्रस्थानात जातील, त्यावेळी त्यांनी ती वस्त्रे घालावी, म्हणजे ते दोषी ठरून मरणार नाहीत. “अहरोन व त्याच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.”

  5. त्याचा पुत्र जो याजक म्हणून त्याचा वारस होईल आणि सभामंडपात सेवा करण्यासाठी पवित्रस्थानात येईल त्याने ती वस्त्रे सात दिवस अंगात घालावी.

  6. अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी धूप.

  7. पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे; आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.”

  8. पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.

  9. पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.

  10. परंतु कोणतेही पापार्पण, ज्याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी सभामंडपात आणले जाते ते खाऊ नये; ते जाळून टाकावे.”

  11. याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.

  12. “अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्‍हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा.

  13. कारण इस्राएली लोकांची अशुद्धता आणि बंडखोरी, त्यांची पापे कोणतीही असोत, अशाप्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित्त करावे. त्याचप्रमाणे त्याने सभामंडपासाठीही असेच करावे, कारण तो त्यांच्यामध्ये उभारला असून त्यांच्या अशुद्धतेने वेढला गेला आहे.

  14. अहरोन प्रायश्चित्त करण्यासाठी परमपवित्रस्थानात जाईल, तेव्हापासून तो परत येईपर्यंत, तो स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबीयांसाठी व सर्व इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित्त करेपर्यंत कोणीही सभामंडपात जाऊ नये.

  15. “परमपवित्रस्थान, सभामंडप व वेदी यांच्यासाठी प्रायश्चित्तविधी पूर्ण केल्यानंतर अहरोनाने जिवंत बोकड आणावा.

  16. “मग अहरोनाने सभामंडपात पुन्हा यावे व परमपवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागमिश्रित वस्त्रे काढावीत आणि तिथेच ठेवावीत.

  17. नंतर त्याने पवित्रस्थानी पाण्याने स्नान करावे, आपली नियमित वस्त्रे घालावी. मग त्याने बाहेर यावे व स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्ताचे होमार्पण करावे म्हणून स्वतःसाठी होमार्पण व लोकांसाठीही होमार्पण करावे.

  18. पापार्पणाच्या ज्या गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त अहरोनाने प्रायश्चित्तासाठी पवित्रस्थानात नेले होते, त्यांचे मृतदेह, कातडी व आतडी छावणीबाहेर नेऊन अग्नीने जाळण्यात यावीत.”

  19. त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्‍याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे.