- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Atonement बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही.
प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.
जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे.
जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये.
इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”
जेव्हा एखादा पुढारी अजाणतेने याहवेह, त्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करून पाप करतो व दोषी ठरतो,
ज्यावेळी त्याला हे पाप कळून येईल तेव्हा त्याने एका निर्दोष बोकडाचे अर्पण आणावे.
त्याने त्या बोकडाच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व होमार्पणाच्या स्थळी त्याचा वध करून तो याहवेहला अर्पावा. हे त्याचे पापार्पण होय.
मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना ते लावावे व राहिलेले रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.
शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे या सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशाप्रकारे पुढार्याच्या पापाबद्दल, याजक प्रायश्चित करेल आणि त्याची क्षमा होईल.
समुदायातील सामान्य मनुष्याने चुकून पाप केले व याहवेहने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे ते दोषी ठरले,
पण जेव्हा ते त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा त्यांनी आपल्या पापाबद्दल प्रायश्चिताचे अर्पण म्हणून एक निर्दोष शेळी आणावी.
त्या व्यक्तीने त्याचे हात पापार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि होमार्पणाच्या स्थळी तिचा वध करावा.
याजकाने आपल्या बोटांनी काही रक्त घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
मग सर्व चरबी काढून शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने तिचा याहवेहसाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा. अशाप्रकारे याजकाने त्या व्यक्तीसाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
जर कोणी पापार्पणासाठी अर्पण म्हणून एखादे कोकरू घेऊन येतो, तर ती एक निर्दोष मादी असावी.
होमार्पणाच्या पशूंचा वध करतात तिथे तिला आणावे, तिच्या मस्तकावर हात ठेवावा आणि पापार्पण म्हणून तिचा वध करावा.
“नंतर याजकाने पापार्पणाच्या रक्तातील काही रक्त बोटांनी घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे, व राहिलेले सर्व रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.”
शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीचा उपयोग करतात, तसा या चरबीचा उपयोग करावा. याजकाने सर्व चरबी काढून तिचे वेदीवर याहवेहसमोर होम करावे. अशाप्रकारे याजक त्या व्यक्तींसाठी प्रायश्चित करेल, म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.
आणि त्यांनी केलेल्या पापांचा दंड म्हणून कळपातील एक मादी कोकरू किंवा शेळी याहवेहला पापार्पण अशी करावी; आणि याजकाने त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.
परंतु एखाद्याला याहवेहला कोकरू देणे शक्य नसेल, तर त्याने आपल्या पापांबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक पापार्पणासाठी व एक होमार्पणासाठी आणावी.
त्याने ती याजकाकडे आणावी आणि याजकाने प्रथम पापार्पणाचा यज्ञ करावा. त्याने त्या पक्ष्याची मान मुरगळावी, परंतु डोके मानेपासून वेगळे करू नये.
नंतर पापार्पणाचे काही रक्त वेदीभोवती शिंपडावे. बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय.
दुसरा पक्षी त्याने विधिपूर्वक होमार्पण म्हणून अर्पावा. अशाप्रकारे याजकाने त्यांच्यासाठी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.
हे शुद्ध होण्याचे दिवस संपल्यानंतर तिला पुत्र झालेला असो की कन्या, तिला पुढील नियम लागू आहेत: तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरू आणावे व पापार्पणासाठी होला किंवा पारव्याचे पिलू सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे घेऊन जावे.