Skip to content

Atonement बद्दल बायबलमधील वचने

166 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “नंतर त्याने बाहेर जाऊन लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बोकडाचा वध करावा; बोकडाचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि गोर्‍ह्याचे रक्त त्याने ज्या ठिकाणी शिंपडले, त्याच ठिकाणी म्हणजे दयासनावर व दयासनासमोर ते शिंपडावे.

  2. कारण इस्राएली लोकांची अशुद्धता आणि बंडखोरी, त्यांची पापे कोणतीही असोत, अशाप्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित्त करावे. त्याचप्रमाणे त्याने सभामंडपासाठीही असेच करावे, कारण तो त्यांच्यामध्ये उभारला असून त्यांच्या अशुद्धतेने वेढला गेला आहे.

  3. अहरोन प्रायश्चित्त करण्यासाठी परमपवित्रस्थानात जाईल, तेव्हापासून तो परत येईपर्यंत, तो स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबीयांसाठी व सर्व इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित्त करेपर्यंत कोणीही सभामंडपात जाऊ नये.

  4. “मग त्याने तिथून निघून याहवेहसमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याने गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.

  5. काही रक्त घेऊन वेदीवर आपल्या बोटांनी सात वेळा शिंपडावे. अशाप्रकारे इस्राएलांच्या अशुद्धतेपासून वेदी शुद्ध व पवित्र करावी.

  6. नंतर त्याने पवित्रस्थानी पाण्याने स्नान करावे, आपली नियमित वस्त्रे घालावी. मग त्याने बाहेर यावे व स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्ताचे होमार्पण करावे म्हणून स्वतःसाठी होमार्पण व लोकांसाठीही होमार्पण करावे.

  7. त्याने पापार्पणासाठी ठेवलेल्या चरबीचा वेदीवर होम करावा.

  8. “ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बोकड अरण्यात सोडून दिला, त्याने आपली वस्त्रे धुवावी, पाण्याने स्नान करावे आणि त्यानंतर छावणीत परत यावे.

  9. पापार्पणाच्या ज्या गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त अहरोनाने प्रायश्चित्तासाठी पवित्रस्थानात नेले होते, त्यांचे मृतदेह, कातडी व आतडी छावणीबाहेर नेऊन अग्नीने जाळण्यात यावीत.”

  10. ज्या मनुष्याने ते जाळून टाकले, त्याने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे; त्यानंतर छावणीत परत यावे.

  11. तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये

  12. कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल.

  13. तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय.

  14. अभिषिक्त म्हणून आपल्या वडिलांच्या नंतर नियुक्त केलेल्या याजकाने प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र तागाची वस्त्रे घालावीत

  15. त्याने परमपवित्रस्थान, सभामंडप, वेदी, याजकवर्ग व इस्राएली लोक यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे.

  16. “तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.” याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले.

  17. “ ‘आता जर तुम्ही एक समुदाय म्हणून याहवेहने मोशेला दिलेल्या या आज्ञांपैकी कोणतीही आज्ञा पाळण्यास नकळतपणे अपयशी ठरला—

  18. ज्या आज्ञा याहवेहने मोशेद्वारे तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या दिवशी त्या दिल्या तेव्हापासून भविष्यातही येणार्‍या पिढ्यांसाठी त्या असतील—

  19. आणि जर समुदाय जागृत नसताना हे नकळत घडले असेल, तर संपूर्ण समुदायाने एका तरुण गोर्‍ह्याचे याहवेहला सुवासिक होमार्पण करावे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण आणि पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  20. याजकाने सर्व इस्राएली समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल; कारण त्यांनी मुद्दाम पाप केले नव्हते आणि त्यांनी याहवेहला आपल्या पापाबद्दल अन्नार्पण व पापार्पण सादर केले आहेत.

  21. सर्व इस्राएली समुदाय व त्यामध्ये राहणारे परदेश्यांची क्षमा केली जाईल, कारण सर्वांनी जे पाप केले ते नकळत झाले होते.

  22. “ ‘परंतु जर केवळ एकाच व्यक्तीने नकळत पाप केले असेल, तर त्या व्यक्तीने पापार्पणासाठी एक वर्षाची शेळी आणावी.

  23. ज्या व्यक्तीने नकळत पाप केले आहे त्या व्यक्तीसाठी याजकाने याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे आणि जेव्हा प्रायश्चित केले जाईल, तेव्हा त्या व्यक्तीला क्षमा करण्यात येईल.

  24. आणि सात कोकर्‍यातील प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.

  25. प्रायश्चित्ताचे पापार्पण, नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण व त्याचे पेयार्पण, याबरोबरच पापार्पणासाठी एक बोकड अर्पण करावा.