मुख्य मजकुरावर जा

Caiaphas

9 वचने · 1 कुटुंब सदस्य

Caiaphas चा उल्लेख असलेली वचने

  1. नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडीलजन महायाजक कयफाच्या राजवाड्यात एकत्र जमले.

  2. येशूंना अटक करून त्यांना महायाजक कयफा याच्याकडे नेले; त्या ठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते.

  3. हन्ना व कयफा हे महायाजक पदावर होते. यावेळी जखर्‍याहचा पुत्र योहानास अरण्यात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले.

  4. त्यांच्यापैकी कयफा नावाचा मनुष्य त्या वर्षी महायाजक होता, तो म्हणाला, “तुम्हाला काहीच माहीत नाही!

  5. प्रथम त्यांनी येशूंना त्या वर्षाचा महायाजक कयफाचा सासरा हन्नाकडे नेले.

  6. याच कयफाने यहूदी पुढार्‍यांसोबत अशी मसलत केली होती की, लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे हिताचे आहे.

  7. मग हन्नाने येशूंना बांधलेल्या अवस्थेतच महायाजक कयफा याजकडे पाठविले.

  8. मग यहूदी पुढार्‍यांनी येशूंना कयफाकडून रोमी राज्यपालाच्या राजवाड्यात नेले. तोपर्यंत पहाट झाली होती आणि आपण नियमशास्त्रानुसार अशुद्ध होऊ नये आणि आपल्याला वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः राजवाड्यात गेले नाहीत.

  9. महायाजक हन्ना तिथे होता, तसेच कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि महायाजकांच्या कुटुंबातील इतर सर्वजण तिथे हजर होते.