- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Judge बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर.
त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील.
तुमच्या समस्या, तुमचे ओझे व तुमची भांडणे माझ्यासारखा एकटा मनुष्य कसा सोडवू शकेल?
तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.”
तुम्ही मला उत्तर देऊन म्हणाला, “तुम्ही जे करण्याचा प्रस्ताव दिला ते उत्तम आहे.”
म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोत्रांतून प्रमुख, ज्ञानी आणि आदरणीय पुरुष घेतले आणि त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.
आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो.
न्याय करताना पक्षपातीपणा दाखवू नका; लहान व मोठे यांचे म्हणणे समानतेत ऐकून घ्या. कोणालाही घाबरू नका; कारण न्याय हा परमेश्वराकडूनच असतो. ज्या तक्रारी तुम्हाला सोडविण्यास कठीण वाटतील, त्या माझ्याकडे आणा आणि मी ऐकेन.”
याहवेह तुमचे परमेश्वर जी सर्व शहरे तुमच्या प्रत्येक गोत्राला देणार आहेत, त्या सर्व शहरांमध्ये न्यायाधीश आणि शास्ते यांची तुम्ही नेमणूक करावी व त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.
भेदभाव किंवा विपरीत असा न्याय कधीही करू नये. लाच घेऊ नये, कारण लाच ही शहाण्या माणसांना आंधळे करते आणि निरपराध्याचे शब्द विपरीत करते.
न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल.
तुमच्या न्यायालयात खटले येतात, ज्यांचा निवाडा करण्याचे काम तुमच्या आवाक्याबाहेरचे असेल—मग ते रक्तपात असो, फिर्याद अथवा मारामारी असोत—याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुम्ही तो वाद न्यावा.
त्याकाळी जे लेवी याजक किंवा न्यायाधीश आपल्या पदावर असतील, त्यांच्याशी तुम्ही मसलत करावी आणि ते त्या वादाचा निर्णय तुम्हाला देतील.
ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या.
ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा.
एखाद्याने मत्सराने खोटी साक्ष देऊन कोणावर चुकीचा आरोप लावल्यास,
त्या दोन्हीही इसमांना याहवेहसमोर, त्यावेळी जबाबदार असलेल्या याजकांपुढे आणि न्यायाधीशांपुढे आणावे.
न्यायाधीशांनी त्यांची बारकाईने चौकशी करावी आणि साक्षीदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले व तो दुसर्या इस्राएली बांधवावर खोटा आरोप करीत असेल,
तर त्याच्या बांधवाचे जे करण्याचे त्याने मनात योजिले होते, तेच त्याचे करण्यात यावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्टाई तुम्ही घालवून टाकावी.
लोकांमध्ये वाद उपस्थिती झाला आणि न्याय मागण्यासाठी त्यांनी न्यायालयात जावे व न्यायाधीशाने त्यांचा निवाडा करावा. जो निर्दोष असेल त्याला निर्दोषी ठरवावे व जो दोषी असेल त्याला दोषी ठरवावे.
दोषी मनुष्य जर फटक्यांच्या शिक्षेस पात्र ठरला, तर न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे आणि आपल्यादेखत त्याच्या अपराधाप्रमाणे मोजून फटके मारावेत,
परंतु न्यायाधीशाने त्याला चाळीस पर्यंतच फटके मारावेत, अधिक फटके मारू नयेत. नाहीतर, अधिक फटके मारल्यास, तुमच्या बंधूंची तुमच्यादेखत अप्रतिष्ठा होईल.
आता दोन वेश्या राजाकडे येऊन त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या.
त्यांच्यापैकी एक म्हणाली, “माझे स्वामी, मला क्षमा करा. ही स्त्री आणि मी एकाच घरात राहतो आणि ती माझ्यासोबत असताना मला एक मूल झाले.
माझे मूल जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी, या स्त्रीला सुद्धा एक मूल झाले. आम्ही एकट्याच होतो; घरात आम्हा दोघींशिवाय अन्य कोणी नव्हते.