Barabbas
Barabbas चा उल्लेख असलेली वचने
या वर्षी येशू बरब्बास नावाचा एक प्रसिद्ध गुन्हेगार तुरुंगात होता.
त्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी जमली असताना, पिलाताने लोकांना विचारले, “सणानिमित्त मी तुमच्यासाठी कोणाला सोडून देऊ? येशू बरब्बास किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूंना?”
परंतु तोपर्यंत प्रमुख याजकांनी व वडील यांनी “बरब्बाला सोडा” अशी मागणी करून येशूंना जिवे मारावे म्हणून समुदायाचे मन वळविले.
राज्यपालांनी विचारले, “या दोघांपैकी मी तुम्हाकरिता कोणाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे?” जमावाने उत्तर दिले, “बरब्बाला सोडावे!”
तेव्हा पिलाताने बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता सैनिकांच्या स्वाधीन केले.
बरब्बा म्हटलेला एक मनुष्य त्यावेळी बंडखोरांबरोबर तुरुंगात शिक्षा भोगत होता, त्याने उठाव करून खून केला होता.
पण तेवढ्यात येशूंच्या ऐवजी बरब्बाला सोडा अशी मागणी करण्यासाठी प्रमुख याजकांनी समुदायास चिथाविले.
लोकांना खुश करण्याच्या विचाराने, पिलाताने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले.
परंतु गर्दीतील सर्व लोक ओरडून म्हणाले, “याला जिवे मारा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”
ते ओरडले, “नाही, त्याला नको! आम्हाला बरब्बा हवा आहे!” बरब्बाने तर बंडात भाग घेतला होता.