मुख्य मजकुरावर जा

Judge बद्दल बायबलमधील वचने: Kings and other rulers as

43 वचने · 6 पैलू

Kings and other rulers as बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता दोन वेश्या राजाकडे येऊन त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या.

  2. त्यांच्यापैकी एक म्हणाली, “माझे स्वामी, मला क्षमा करा. ही स्त्री आणि मी एकाच घरात राहतो आणि ती माझ्यासोबत असताना मला एक मूल झाले.

  3. माझे मूल जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी, या स्त्रीला सुद्धा एक मूल झाले. आम्ही एकट्याच होतो; घरात आम्हा दोघींशिवाय अन्य कोणी नव्हते.

  4. “रात्रीच्या वेळी या स्त्रीचे मूल मरण पावले, कारण ती त्याच्या अंगावर झोपली.

  5. तेव्हा ती मध्यरात्री उठली आणि मी आपली दासी झोपेतच असताना माझ्याजवळ झोपलेले माझे मूल तिने घेतले आणि तिने ते तिच्या उराशी ठेवले व तिचे मेलेले मूल माझ्या उराशी ठेवले.

  6. सकाळी मी माझ्या मुलाला दूध पाजण्यासाठी उठले; आणि तो मेलेला होता! परंतु दिवसाच्या उजेडात जेव्हा मी त्याला निरखून पाहिले, तेव्हा मला समजले की मी ज्याला जन्म दिला तो हा नव्हे.”

  7. दुसरी स्त्री म्हणाली, “जिवंत असलेला मुलगा माझा आहे; मेलेला तुझा आहे.” परंतु पहिलीने हट्ट केला, “नाही! मेलेला तुझा आहे; जिवंत माझा आहे.” असा त्यांनी राजासमोर वादविवाद केला.

  8. राजाने म्हटले, “एक म्हणते, ‘माझा मुलगा जिवंत आहे आणि तुझा मुलगा मेला आहे,’ तर दुसरी म्हणते, ‘नाही! तुझा मुलगा मेला आहे आणि माझा जिवंत आहे.’ ”

  9. तेव्हा राजाने म्हटले, “मला एक तलवार आणून द्या.” तेव्हा त्यांनी राजासाठी तलवार आणली.

  10. नंतर राजाने आज्ञा केली: “जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा आणि अर्धा भाग एकीला आणि अर्धा भाग दुसरीला द्यावा.”

  11. ज्या स्त्रीचा जिवंत मुलगा होता तिचे हृदय तिच्या मुलासाठी ममतेने तुटले आणि ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, कृपा करून जिवंत मुलगा तिला द्या! त्याला मारू नका!” परंतु दुसरी म्हणाली, “तो ना तुला ना मला मिळणार. त्याचे दोन तुकडे करा!”

  12. तेव्हा राजाने आपला न्याय दिला: “मूल पहिल्या स्त्रीला द्या. त्याला मारू नका; तीच त्याची आई आहे.”

  13. राजाने दिलेला हा न्याय जेव्हा सर्व इस्राएलने ऐकला, तेव्हा त्यांना राजाचा आदर वाटू लागला, कारण त्यांनी पाहिले की न्याय देण्यासाठी राजाला परमेश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले आहे.

  14. अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलास जिवंत केले होते, तिला म्हणाला, “तुझ्या कुटुंबीयांनी घेऊन निघून जा आणि जिथे तुला राहता येईल तिथे राहा, कारण याहवेह या भूमीवर मोठा दुष्काळ पाठविणार आहेत आणि तो सात वर्षे टिकणार आहे.”

  15. त्या स्त्रीने परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे केले. ती आणि तिचे कुटुंब दूर निघून पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिले.

  16. सात वर्षाच्या शेवटी ती पलिष्टी देशातून परत आली आणि आपले घर आणि जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला विनंती करण्यास गेली.

  17. त्यावेळी राजा परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजीशी बोलत होता आणि तो म्हणाला, “अलीशाने जी सर्व मोठी कृत्ये केली ती मला सांग.”

  18. जेव्हा गेहजी राजाला सांगत असता कसे अलीशाने मृताला जिवंत केले; ती स्त्री आपली जमीन आणि घर परत मिळावे म्हणून विनंती करण्यास राजाकडे आली होती. गेहजी म्हणाला, “माझे स्वामी, माझे महाराज, हीच ती स्त्री आणि अलीशाने ज्या मुलाला जिवंत केले तोच हा पुत्र.”

  19. राजाने त्याबद्दल स्त्रीला विचारले आणि तिने त्याला सर्व सांगितले. मग त्याने आपल्या एका अधिकार्‍याला तिच्या मदतीसाठी नेमून दिले आणि त्याला म्हटले, “तिचे जे काही होते, ते सर्व तिला परत द्या, तिने देश सोडल्यापासून आजपर्यंत तिच्या मालकीचे सर्वकाही, अगदी तिच्या जमिनीचे सर्व उत्पन्न तिला परत करा.”

  20. शलोमोनाची गीत रचना हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.

  21. तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो, तुमच्या पीडितांचा न्यायनिवाडा न्यायीपणाने करो.

  22. मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो, आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.

  23. तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो आणि गरजूंच्या मुलांना वाचवो; तो जुलमीला चिरडून टाको.

  24. येशू राज्यपालाच्या पुढे उभे होते आणि राज्यपालाने त्यांना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हटले तसे.”

  25. महायाजक आणि यहूदी पुढाऱ्यांनी येशूंवर अनेक आरोप केले त्यावेळी येशू अगदी शांत राहिले.