Skip to content

Portius

12 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Porcius Festus, Festus, Porcius

Portius चा उल्लेख असलेली वचने

  1. दोन वर्षे निघून गेल्यानंतर, पुढे पुर्क्य फेस्त हा राज्यपाल म्हणून फेलिक्सच्या जागेवर आला. परंतु फेलिक्सला यहूदीयावर कृपादृष्टी दाखवायची होती म्हणून तो पौलाला कैदेतच ठेऊन निघून गेला.

  2. तीन दिवसानंतर प्रांतात आल्यानंतर, फेस्त कैसरीयाहून यरुशलेम येथे वर गेला,

  3. परंतु फेस्ताने त्यांना उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे कैदेत आहे व मी लवकरच स्वतः तिथे जाणार आहे.

  4. तेव्हा यहूदी लोकांना प्रसन्न करण्यास आतुर असलेल्या फेस्ताने पौलाला विचारले, “यरुशलेमला जाऊन तिथे माझ्यापुढे तुझी चौकशी व्हावी, यासाठी तू तयार आहेस काय?”

  5. त्यावर फेस्ताने आपल्या सल्लागारांची मसलत घेऊन जाहीर केले, “ठीक आहे. तू कैसराजवळ न्यायाची याचना केली आहेस, तर तू कैसरापुढेच जाशील!”

  6. पुढे थोड्याच दिवसांनी राजा अग्रिप्पा आणि बर्णीका कैसरीयास फेस्तास आदर देण्यासाठी आले.

  7. ते तिथे अनेक दिवस वास्तव्य करीत असल्यामुळे, फेस्ताला राजाबरोबर पौलाच्या प्रकरणाची चर्चा करण्यास वेळ मिळाला. तो म्हणाला: “फेलिक्साने ज्याला कैदेत तसेच ठेवले होते असा एक मनुष्य येथे आहे.

  8. त्यावर अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “मला स्वतः या माणसाचे म्हणणे ऐकायला आवडेल.” फेस्ताने उत्तर दिले. “तर उद्याच त्याचे भाषण ऐकावयास मिळेल.”

  9. मग फेस्त म्हणाले: “अग्रिप्पा महाराज आणि सर्व उपस्थिती लोकहो, या मनुष्याला पाहा! याच्याविरुद्ध सर्व यहूदी समाजाने यरुशलेम व कैसरीया, यांनी माझ्याकडे विनंती केली आहे आणि अशी ओरड करीत आहेत की त्याने अधिक काळ जिवंत राहू नये.

  10. हे ऐकताच फेस्त मध्येच म्हणाला, “पौला, तुझे मन ठिकाण्यावर नाही. तुझ्या दीर्घकाळाच्या अभ्यासाने तुझे मन भ्रमिष्ट झाले आहे.”

  11. परंतु पौलाने उत्तर केले, “अत्यंत थोर फेस्त महाराज, मी वेडा नाही, मी सत्य व वैचारिकदृष्ट्या योग्य तेच सांगत आहे.

  12. अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “त्याने कैसराजवळ न्याय मागितला नसता, तर त्याची सुटका करता आली असती.”