मुख्य मजकुरावर जा

Gehazi

12 वचने

Gehazi चा उल्लेख असलेली वचने

  1. त्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “शूनेमकरीच्या स्त्रीला बोलव.” त्याने तिला बोलाविले आणि ती त्याच्यापुढे उभी राहिली.

  2. अलीशाने गेहजीला विचारले, “आपण तिच्यासाठी काय करू शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला मूल नाही व आता तिचा पती वृद्ध झाला आहे.”

  3. ती निघाली आणि कर्मेल डोंगराजवळ परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. जेव्हा त्याने तिला दुरून पहिले, तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “बघ, ती शूनेमकरीण!

  4. जेव्हा ती परमेश्वराच्या मनुष्याच्या डोंगरावर पोहोचली, तेव्हा तिने त्याचे पाय धरले. जेव्हा गेहजी तिला दूर लोटू लागला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला सोड! ती फार दुःखात आहे, पण याहवेहने त्याचे कारण मला कळविले नाही आणि ते माझ्यापासून गुप्त ठेवले.”

  5. अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी तुझ्या हातात घे आणि धाव. मार्गात तुला कोणी भेटला तर अभिवादन करू नको आणि जर तुला कोणी अभिवादन केले तर त्यांना उत्तर देऊ नकोस. माझी काठी मुलाच्या तोंडावर ठेव.”

  6. गेहजी पुढे गेला आणि त्याने त्या मुलाच्या तोंडाला काठीचा स्पर्श केला, पण कोणताच आवाज नाही वा प्रतिसाद मिळाला. म्हणून गेहजी परत अलीशाला भेटण्यास गेला आणि त्याला सांगितले, “मुलगा जागा झाला नाही.”

  7. मग अलीशाने गेहजीला बोलावून म्हटले, “शूनेमकरीणीला बोलव.” त्याने तिला बोलविल्यावर, तो तिला म्हणाला, “हा घे, तुझ्या पुत्र!”

  8. इकडे परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजी स्वतःस म्हणाला, “माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून नजराणे न स्वीकारता त्याला असेच जाऊ दिले. जिवंत याहवेहची शपथ, आता मी स्वतः त्याच्यामागे पळत जाईन आणि त्याच्यापासून काहीतरी घेईन.”

  9. गेहजी नामानाच्या मागे धावला. नामानाने जेव्हा त्याला त्याच्याकडे धावत येताना पाहिले, तो आपल्या रथातून खाली उतरून त्यास भेटण्यास गेला. नामानाने विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?”

  10. गेहजी आपल्या धन्याच्या पुढे जाऊन उभा राहिला, तेव्हा अलीशाने त्याला विचारले, “गेहजी, तू कुठे गेला होतास?” गेहजीने उत्तर दिले, “तुमचा सेवक कुठेच गेला नव्हता.”

  11. त्यावेळी राजा परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजीशी बोलत होता आणि तो म्हणाला, “अलीशाने जी सर्व मोठी कृत्ये केली ती मला सांग.”

  12. जेव्हा गेहजी राजाला सांगत असता कसे अलीशाने मृताला जिवंत केले; ती स्त्री आपली जमीन आणि घर परत मिळावे म्हणून विनंती करण्यास राजाकडे आली होती. गेहजी म्हणाला, “माझे स्वामी, माझे महाराज, हीच ती स्त्री आणि अलीशाने ज्या मुलाला जिवंत केले तोच हा पुत्र.”