Skip to content

Judge बद्दल बायबलमधील वचने

91 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “रात्रीच्या वेळी या स्त्रीचे मूल मरण पावले, कारण ती त्याच्या अंगावर झोपली.

  2. तेव्हा ती मध्यरात्री उठली आणि मी आपली दासी झोपेतच असताना माझ्याजवळ झोपलेले माझे मूल तिने घेतले आणि तिने ते तिच्या उराशी ठेवले व तिचे मेलेले मूल माझ्या उराशी ठेवले.

  3. सकाळी मी माझ्या मुलाला दूध पाजण्यासाठी उठले; आणि तो मेलेला होता! परंतु दिवसाच्या उजेडात जेव्हा मी त्याला निरखून पाहिले, तेव्हा मला समजले की मी ज्याला जन्म दिला तो हा नव्हे.”

  4. दुसरी स्त्री म्हणाली, “जिवंत असलेला मुलगा माझा आहे; मेलेला तुझा आहे.” परंतु पहिलीने हट्ट केला, “नाही! मेलेला तुझा आहे; जिवंत माझा आहे.” असा त्यांनी राजासमोर वादविवाद केला.

  5. राजाने म्हटले, “एक म्हणते, ‘माझा मुलगा जिवंत आहे आणि तुझा मुलगा मेला आहे,’ तर दुसरी म्हणते, ‘नाही! तुझा मुलगा मेला आहे आणि माझा जिवंत आहे.’ ”

  6. तेव्हा राजाने म्हटले, “मला एक तलवार आणून द्या.” तेव्हा त्यांनी राजासाठी तलवार आणली.

  7. नंतर राजाने आज्ञा केली: “जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा आणि अर्धा भाग एकीला आणि अर्धा भाग दुसरीला द्यावा.”

  8. ज्या स्त्रीचा जिवंत मुलगा होता तिचे हृदय तिच्या मुलासाठी ममतेने तुटले आणि ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, कृपा करून जिवंत मुलगा तिला द्या! त्याला मारू नका!” परंतु दुसरी म्हणाली, “तो ना तुला ना मला मिळणार. त्याचे दोन तुकडे करा!”

  9. तेव्हा राजाने आपला न्याय दिला: “मूल पहिल्या स्त्रीला द्या. त्याला मारू नका; तीच त्याची आई आहे.”

  10. राजाने दिलेला हा न्याय जेव्हा सर्व इस्राएलने ऐकला, तेव्हा त्यांना राजाचा आदर वाटू लागला, कारण त्यांनी पाहिले की न्याय देण्यासाठी राजाला परमेश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले आहे.

  11. अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलास जिवंत केले होते, तिला म्हणाला, “तुझ्या कुटुंबीयांनी घेऊन निघून जा आणि जिथे तुला राहता येईल तिथे राहा, कारण याहवेह या भूमीवर मोठा दुष्काळ पाठविणार आहेत आणि तो सात वर्षे टिकणार आहे.”

  12. त्या स्त्रीने परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे केले. ती आणि तिचे कुटुंब दूर निघून पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिले.

  13. सात वर्षाच्या शेवटी ती पलिष्टी देशातून परत आली आणि आपले घर आणि जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला विनंती करण्यास गेली.

  14. त्यावेळी राजा परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजीशी बोलत होता आणि तो म्हणाला, “अलीशाने जी सर्व मोठी कृत्ये केली ती मला सांग.”

  15. जेव्हा गेहजी राजाला सांगत असता कसे अलीशाने मृताला जिवंत केले; ती स्त्री आपली जमीन आणि घर परत मिळावे म्हणून विनंती करण्यास राजाकडे आली होती. गेहजी म्हणाला, “माझे स्वामी, माझे महाराज, हीच ती स्त्री आणि अलीशाने ज्या मुलाला जिवंत केले तोच हा पुत्र.”

  16. राजाने त्याबद्दल स्त्रीला विचारले आणि तिने त्याला सर्व सांगितले. मग त्याने आपल्या एका अधिकार्‍याला तिच्या मदतीसाठी नेमून दिले आणि त्याला म्हटले, “तिचे जे काही होते, ते सर्व तिला परत द्या, तिने देश सोडल्यापासून आजपर्यंत तिच्या मालकीचे सर्वकाही, अगदी तिच्या जमिनीचे सर्व उत्पन्न तिला परत करा.”

  17. त्याने यहूदीयाच्या प्रत्येक तटबंदीच्या शहरांमध्ये न्यायाधीशांची नेमणूक केली.

  18. त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही काय करता ते नीट विचार करा, कारण तुम्ही केवळ मर्त्यांसाठी न्याय करीत नाही, परंतु याहवेहसाठी निर्णय घेता. जेव्हा तुम्ही जे काही करीत असता तेव्हा ते तुमच्याबरोबर आहेत.

  19. आता याहवेहचे भय तुम्हावर असू द्या, काळजीपूर्वक न्याय करा, कारण आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे अन्याय किंवा पक्षपात किंवा लाचलुचपत असे काही चालत नाही.”

  20. यरुशलेममध्येही, यहोशाफाटने काही लेवी, याजक आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना याहवेहच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी नियुक्त केले. ते यरुशलेममध्ये राहत होते.

  21. त्याने त्यांना असे आदेश दिले: “तुम्ही याहवेहचे भय बाळगूनच विश्वासूपणाने आणि संपूर्ण अंतःकरणाने सेवा करावी.

  22. शहरात राहणाऱ्या तुमच्या लोकांकडून तुमच्यासमोर येणार्‍या प्रत्येक बाबतीत—मग तो रक्तपात असो किंवा कायद्याच्या संबंधात, आज्ञा, हुकूम किंवा नियम—तुम्ही याहवेहविरुद्ध पाप करू नका अशी ताकीद तुम्ही त्यांना द्यावी; नाहीतर त्यांचा राग तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर येईल. हे असे करा म्हणजे तुम्ही पातक करणार नाही.

  23. संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. अहो सत्ताधीशांनो, तुमचे निकाल खरोखर योग्य असतात काय? तुम्ही लोकांचा न्याय प्रामाणिकपणे करता काय?

  24. नाही, विपरीत न्याय कसा करावा याचा तुम्ही आपल्या मनात शोध लावता आणि तुमचे हात पृथ्वीवर हिंसक कृत्ये पसरवितात.

  25. शलोमोनाची गीत रचना हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.