मुख्य मजकुरावर जा

Judge बद्दल बायबलमधील वचने

91 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो, तुमच्या पीडितांचा न्यायनिवाडा न्यायीपणाने करो.

  2. मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो, आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.

  3. तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो आणि गरजूंच्या मुलांना वाचवो; तो जुलमीला चिरडून टाको.

  4. ज्यांचा कोणी सहायक नाही अशा धावा करणार्‍या दुःखितांना तो मुक्त करेल.

  5. दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो; तो गरजवंताला मृत्यूपासून वाचवेल.

  6. तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल, कारण त्यांचे जीवित रक्त मोलाचे आहे.

  7. तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला

  8. दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.

  9. दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा; दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.

  10. धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,

  11. लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात, परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात.

  12. त्या दिवशी सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी एक गौरवशाली मुकुट, सुंदर पुष्पचक्र असे होतील.

  13. जे न्याय करण्यासाठी बसतात त्यांच्यासाठी ते न्यायाचा आत्मा होतील, जे वेशीतूनच युद्धामधून मागे फिरतात त्यांच्यासाठी ते सामर्थ्याचा उगम असतील.

  14. पवित्र व साधारण यातील फरक आणि शुद्ध व अशुद्ध यात कसा फरक करावा हे त्यांनी माझ्या लोकांना शिकवावे.

  15. “ ‘कोणताही विवाद असल्यास, याजकांनी न्यायाधीश म्हणून असावे आणि माझ्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा. माझ्या नेमलेल्या सर्व सणांसाठी त्यांनी माझे नियम व विधी पाळावे आणि त्यांनी माझे शब्बाथ पवित्र राखावे.

  16. येशूंना अटक करून त्यांना महायाजक कयफा याच्याकडे नेले; त्या ठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते.

  17. परंतु पेत्र काही अंतरावरून त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला. त्याने प्रवेश केला आणि पहारेकर्‍यांसोबत जाऊन काय होते ते पाहत बसला.

  18. मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी खोटे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते.

  19. परंतु अनेक खोटे साक्षीदार पुढे आले तरी ते त्यांना सापडले नाही. शेवटी दोन माणसे पुढे आली,

  20. “हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ”

  21. हे ऐकून महायाजक उभा राहिला आणि त्याने येशूंना म्हटले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय? हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे?”

  22. येशू राज्यपालाच्या पुढे उभे होते आणि राज्यपालाने त्यांना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हटले तसे.”

  23. महायाजक आणि यहूदी पुढाऱ्यांनी येशूंवर अनेक आरोप केले त्यावेळी येशू अगदी शांत राहिले.

  24. “हे लोक तुझ्यावर अनेक गोष्टींचा दोषारोप करीत आहेत, हे तू ऐकत नाही काय?” पिलाताने येशूंना विचारले,

  25. परंतु येशूंनी एकाही आरोपाचे उत्तर दिले नाही. राज्यपालासाठी ही खूप आश्चर्यचकित गोष्ट होती.