मुख्य मजकुरावर जा

Eleazar

61 वचने · 7 कुटुंब सदस्य

Eleazar चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.”

  2. याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने केले. त्याने यहोशुआला एलअज़ार याजक व सर्व समाजापुढे उभे केले.

  3. एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासाने आपल्याबरोबर पवित्रस्थानातील साहित्य व इशारा देण्यासाठी कर्णे घेतले होते, त्याच्यासह मोशेने प्रत्येक गोत्रातील एक हजार पुरुषांना युद्धात पाठवले.

  4. आणि कैदी, लूट, जनावरे यांना मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेकडील छावणीत मोशे, एलअज़ार याजक आणि इतर इस्राएलच्या मंडळीसमोर आणले.

  5. मोशे, एलअज़ार याजक आणि समाजाचे सर्व पुढारी त्यांना भेटण्यास छावणीबाहेर गेले.

  6. यानंतर एलअज़ार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “याहवेहने मोशेला दिलेल्या नियमानुसार ही आज्ञा आहे:

  7. “तू आणि एलअज़ार याजक व समाजाच्या कुटुंब प्रमुखांनी कैद केलेले सर्व लोक व जनावरे यांची मोजणी करावी.

  8. त्यांच्या अर्ध्या हिश्श्यातून ते घे व याहवेहचा वाटा म्हणून तो एलअज़ार याजक याला दे.

  9. म्हणून याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशे व एलअज़ार याजकाने केले.

  10. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने याहवेहचा हिस्सा म्हणून एलअज़ार याजकाला खंडणी दिली.

  11. मोशे व एलअज़ार याजक यांनी ते सोने; घडीव दागिने त्यांच्यापासून स्वीकारले.

  12. मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले.

  13. म्हणून गाद गोत्राचे व रऊबेन गोत्राचे लोक मोशे, एलअज़ार याजक व समाजाच्या पुढाऱ्यांकडे आले आणि म्हणाले,

  14. नंतर मोशेने एलअज़ार याजकाला व नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुटुंबप्रमुखांना आज्ञा दिली.

  15. “ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ.

  16. (मग इस्राएली लोक बेने याकानच्या विहिरी सोडून प्रवास करीत मोसेरापर्यंत आले. तिथे अहरोन मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा पुत्र एलअज़ार त्याच्यानंतर याजक झाला.

  17. एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या गोत्राच्या कुलप्रमुखांनी इस्राएली लोकांना कनान देशातील हे भाग वतन म्हणून दिले.

  18. त्या एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि पुढाऱ्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या, “याहवेहने मोशेला आज्ञा दिली होती की आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला वतन दिले जावे.” तेव्हा यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या भावांबरोबर त्यांना वतन दिले.

  19. या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्‍यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले.

  20. आता लेवीचे कुटुंबप्रमुख कनानातील शिलोहमध्ये असताना एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या इतर गोत्राच्या कुटुंब प्रमुखांकडे आले

  21. म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.

  22. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.”

  23. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला.

  24. अहरोनाचा पुत्र एलअज़ार मरण पावला आणि त्याला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गिबियाह येथे पुरण्यात आले. जे त्याचा पुत्र फिनहासला वतन म्हणून देण्यात आले होते.

  25. एलअज़ाराचा पुत्र व अहरोनाचा नातू फिनहास हा तिथे कोशापुढे सेवा करीत होता.) त्यांनी विचारले, “आम्ही पुन्हा जाऊन आमचा इस्राएली भाऊबंद बिन्यामीन याविरुद्ध लढावे किंवा नाही?” याहवेहने उत्तर दिले, “जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हातात देणार आहे.”