Hor
30.3100, 35.4000 गूगल नकाशावर पाहा
Hor चा उल्लेख असलेली वचने
संपूर्ण इस्राएली समुदाय कादेशहून निघून होर पर्वतावर आला.
एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले,
अहरोन व त्याचा पुत्र एलअज़ार यांना घेऊन होर पर्वतावर जा.
जसे याहवेहने आज्ञापिले त्यानुसार मोशेने केले: सर्व समुदायादेखत ते होर पर्वतावर गेले.
नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले;
त्यांनी कादेश सोडले आणि एदोमच्या सीमेवरील होर पर्वतावर तळ दिला.
याहवेहच्या आज्ञेनुसार अहरोन याजक होर पर्वतावर गेला आणि इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो तिथे मरण पावला.
अहरोन होर पर्वतावर मरण पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता.
मग त्यांनी होर डोंगर सोडून जालमोनाह येथे तळ दिला.
तुझा भाऊ अहरोन होर पर्वतावर मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला, तसा तू देखील नबो पर्वतावर चढून गेल्यावर व कनान देश पाहिल्यावर मरशील आणि आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील.