Salvation बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”
“हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे.
नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले;
ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”
तेव्हा याहवेहने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठविले; ते लोकांना चावले आणि पुष्कळ इस्राएली लोक मरण पावले.
लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.
तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.”
तेव्हा मोशेने कास्याचा साप तयार केला व तो खांबावर टांगला, तेव्हा ज्या कोणाला साप चावला व त्यांनी त्या कास्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगत असत.
लवकरच यशुरून स्वस्थ झाला आणि लाथा झाडू लागला; खाऊन पिऊन धष्टपुष्ट व आकर्षक झाला. उन्मत्त होऊन त्याने त्याच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा तिरस्कार केला, आणि आपल्या तारणदुर्गाचा त्याग केला.
माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.
“याहवेह जिवंत आहे! माझ्या खडकाची स्तुती असो! माझे परमेश्वर, खडक, माझे तारणकर्ता सर्वोच्च असोत!
“ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा कृपा करतात.”
हे सर्व पृथ्वी, याहवेहस्तव स्तुतिस्तोत्रे गा, दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.
“याहवेह परमेश्वरा उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह,
कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला
याहवेह, परत येऊन मला सोडवा; तुमच्या दयेनुसार मला वाचवा.
मग मी सीयोनकन्येच्या वेशींवर तुमची स्तुतीची घोषणा करेन, आणि तुमच्या तारणात आनंद करेन.
याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या सामर्थ्यांमुळे राजा केवढा हर्ष पावतो. तुम्ही दिलेल्या विजयामुळे तो अत्यंत उल्लासतो!
मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या; कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात, आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे.
माझ्यामागे येणार्या लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा. माझ्या आत्म्यास आश्वासन द्या, “मी तुझे तारण आहे.”
याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते. संकटकाळी ते त्यांचे आश्रयदुर्ग असतात.
हे नीतिमत्व मी माझ्या हृदयात दडवून ठेवले नाही, मी तुमचा विश्वासूपणा आणि तुमच्या तारणाच्या मदतीची चर्चा करतो. सर्व मंडळीपासून तुमची प्रीतिपूर्ण दया आणि सत्य ही लपवित नाही.
परंतु जे तुम्हाला शोधतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व हेच म्हणोत, “याहवेह किती थोर आहेत!”
तुमच्या तारणाचा आनंद मला पुनरपि द्या आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी मला राजीपणाचा आत्मा द्या.