Salvation बद्दल बायबलमधील वचने: Clothing
Clothing बद्दल वचने
“याहवेह परमेश्वरा उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह,
तेथील याजकांना तारणाची वस्त्रे नेसवेन, तेथील भक्त आनंदाने सदैव जयजयकार करतील.
कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो; ते नम्रजनांस विजयी करतात.
मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.