Salvation बद्दल बायबलमधील वचने: Of the Gentiles, predicted
Of the Gentiles, predicted बद्दल वचने
“पृथ्वीच्या सर्व टोकांनो, माझ्याकडे वळा व उद्धार पावा; कारण मीच परमेश्वर आहे, अन्य कोणीही नाही.
ते म्हणतात, “याकोबाच्या कुळांना पुनर्स्थापित करणे आणि माझ्या अवशिष्ट इस्राएलच्या लोकांना परत आणणे, हे करण्यासाठी माझा सेवक होणे, हे काम फारच लहानसे आहे, तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे तारण पोचवावे यासाठी मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश व्हावा असेही करेन.”
याहवेह आपली पवित्र भुजा सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत, आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल.