Salvation बद्दल बायबलमधील वचने: Is by Christ alone
Is by Christ alone बद्दल वचने
पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा— आपसात विचारविनिमय करा. पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले, अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले? तो मीच, याहवेह नव्हतो काय? कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही, न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.
“पृथ्वीच्या सर्व टोकांनो, माझ्याकडे वळा व उद्धार पावा; कारण मीच परमेश्वर आहे, अन्य कोणीही नाही.
त्यांनी बघितले की कोणीही नाही, कोणीच मध्यस्थी करणारा नाही, हे पाहून ते अस्वस्थ झाले; म्हणून स्वतःच्या भुजेने त्यांनी त्यांच्याप्रीत्यर्थ तारण निर्माण केले, आणि स्वतःच्या नीतिमत्वाने त्यांना आधार दिला.
तारण दुसर्या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.”