Salvation बद्दल बायबलमधील वचने: Eternal
Eternal बद्दल वचने
परंतु अनंतकाळच्या तारणाने याहवेह इस्राएलला सोडवतील; युगानुयुगापर्यंत ते कधीही लज्जित व अपमानित होणार नाहीत.
तुमची दृष्टी वर आकाशाकडे करा, आणि खाली पृथ्वीकडे पाहा; आकाश धुरासारखे विरून नाहीसे होईल, पृथ्वी वस्त्रांप्रमाणे जीर्ण होईल आणि पृथ्वीवरील लोक चिलटांप्रमाणे मरतील. परंतु माझे तारण सदासर्वकाळ टिकेल. माझ्या नीतिमत्तेचा कधीही अंत होणार नाही.
आणि परिपूर्ण केल्यामुळे, त्यांच्या आज्ञा मानणार्या सर्वांचे अनंतकाळचे तारणकर्ता झाले,