Skip to content

Salvation बद्दल बायबलमधील वचने

158 वचने · 106 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्याकडे जी येणार होती, त्या कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी तुम्हाला सांगितले, त्यांनी या तारणासंबंधी लक्षपूर्वक शोध घेतला आणि मोठ्या काळजीने,

  2. आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौलाला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे, हे तारणच आहे असे समजा.

  3. परंतु तुम्हाला हे माहीत आहे की, आपली पापे दूर करावी म्हणून ख्रिस्त प्रकट झाले. त्यांच्यामध्ये कोणतेही पाप नाही.

  4. परमेश्वराने आपल्यावरील प्रीती अशी प्रकट केलीः त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका पुत्राला या जगात पाठविले यासाठी की, आपल्याला त्यांच्याद्वारे जीवन लाभावे.

  5. प्रीती हीच आहे: आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्यांनी आपणावर प्रीती केली आणि आपल्या पापांसाठी त्यांच्या पुत्राला प्रायश्चिताचा बळी म्हणून पाठविले.

  6. प्रिय बंधूंनो, आपणा सर्वास मिळालेल्या सामाईक तारणाबद्दल मी तुम्हाला लिहिण्यास उत्सुक होतो, परंतु मला तुम्हाला लिहिण्याचे आणि विनंती करण्याचे अगत्य वाटले की जो विश्वास परमेश्वराच्या पवित्र लोकांना एकदाचाच सोपवून दिला होता, तो राखण्याविषयी तुम्ही झटावे.

  7. ते प्रचंड आवाजात घोषणा करीत होते: “राजासनावर बसलेल्या आमच्या परमेश्वरापासून आणि कोकर्‍यापासून तारणप्राप्ती होत आहे.”

  8. यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: “हाल्लेलूयाह! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत!