Hor बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
संपूर्ण इस्राएली समुदाय कादेशहून निघून होर पर्वतावर आला.
एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले,
“अहरोन आपल्या लोकांशी जाऊन मिळेल. इस्राएली लोकांना मी जो देश देत आहे त्यात तो प्रवेश करणार नाही, कारण मरीबाहच्या पाण्याकडे तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेविरुद्ध बंड केले.
अहरोन व त्याचा पुत्र एलअज़ार यांना घेऊन होर पर्वतावर जा.
अहरोनाची वस्त्रे काढून ती त्याचा पुत्र एलअज़ारला घाल, कारण तो त्याच्या लोकांशी जाऊन मिळेल; तो तिथे मरण पावेल.”
जसे याहवेहने आज्ञापिले त्यानुसार मोशेने केले: सर्व समुदायादेखत ते होर पर्वतावर गेले.
मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरविली आणि एलअज़ारावर चढविली आणि अहरोन त्या डोंगराच्या शिखरावर मरण पावला. नंतर मोशे आणि एलअज़ार डोंगरावरून खाली आले,
आणि अहरोन मरण पावला असे जेव्हा समुदायाला समजले, तेव्हा सर्व इस्राएलने तीस दिवस शोक केला.
याहवेहच्या आज्ञेनुसार अहरोन याजक होर पर्वतावर गेला आणि इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो तिथे मरण पावला.
अहरोन होर पर्वतावर मरण पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता.
तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी.
आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी.