Heave-Offering बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अहरोन आणि त्याचे जिवंत राहिलेले पुत्र एलअज़ार आणि इथामारला मोशे म्हणाला, “खमिराशिवाय तयार केलेल्या अन्नार्पणातून उरलेले धान्यार्पण घेऊन याहवेहला अर्पण करा आणि ते तुम्ही वेदीजवळ बसून खावे, कारण ते परमपवित्र आहे.
ते तुम्ही पवित्रस्थानी बसून खावे, कारण याहवेहला अर्पण केलेल्या यज्ञपशूचा तो भाग तुमच्यासाठी व तुमच्या मुलांसाठी ठरलेला वाटा आहे; कारण मला तशी आज्ञा देण्यात आली आहे.
परंतु अर्पण केलेला ऊर व समर्पित केलेली मांडी मात्र तुम्ही कोणत्याही विधिनियमानुसार शुद्ध केलेल्या जागी बसून खावी. इस्राएली लोकांनी अर्पिलेल्या शांत्यर्पणाचा हा भाग तुमचे पुत्र व कन्या यांच्यासाठी आहे.
मग मोशे पुढे म्हणाला, मांडी व ऊर दोन्ही चरबीसह याहवेहसमोर आणावी व ती झोके देऊन परमेश्वराला अर्पण करावी. याहवेहनी आज्ञा दिल्याप्रमाणे हे सर्व भाग सर्वकाळ तुमच्या व तुमच्या मुलांचा वाटा समजावे.”
आणि त्या भूमीचे फळ खाल, तेव्हा त्याचा एक भाग याहवेहसमोर सादर करावा.
तुमच्या मळलेल्या पिठाची पहिली भाकर सादर करावी आणि ती खळ्यातील अर्पण म्हणून सादर करावी.
तुमच्या मळलेल्या पिठाच्या पहिल्या भागाचे हे अर्पण तुम्ही याहवेहला तुमच्या भावी पिढ्यांपर्यंत करावे.
“तू आणि एलअज़ार याजक व समाजाच्या कुटुंब प्रमुखांनी कैद केलेले सर्व लोक व जनावरे यांची मोजणी करावी.
लुटीचे दोन समान भाग करावेत. एक भाग लढाईवर गेलेल्या सैनिकांना व दुसरा भाग समाजातील इतरांना द्यावा.
युद्धास गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून, मनुष्य असो किंवा गुरे, गाढवे किंवा मेंढरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पाचशेमागे एक याप्रमाणे ते वेगळे कर.
त्यांच्या अर्ध्या हिश्श्यातून ते घे व याहवेहचा वाटा म्हणून तो एलअज़ार याजक याला दे.
इस्राएली लोकांच्या अर्ध्या हिश्श्यातून माणसे असो किंवा गुरे, गाढवे, मेंढरे किंवा इतर जनावरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पन्नासापैकी एक याप्रमाणे ते वेगळे कर. व लेवी लोक, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार आहेत त्यांना द्यावे.”
म्हणून याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशे व एलअज़ार याजकाने केले.
युद्धात सैन्याने घेतलेल्या लुटीतून राहिलेली लूट 6,75,000 मेंढरे,
72,000 गुरे,
61,000 गाढवे
आणि 32,000 स्त्रिया ज्यांनी कधीही पुरुषांबरोबर संग केला नव्हता.
युद्धात लढलेल्यांना मिळालेला अर्धा भाग हा होता: 3,37,500 मेंढरे,
ज्यापैकी याहवेहची खंडणी 675 मेंढरे होती;
36,000 गुरे, ज्यापैकी 72 याहवेहची खंडणी होती;
30,500 गाढवे, ज्यापैकी याहवेहची खंडणी 61 होती;
16,000 लोक, ज्यापैकी याहवेहची खंडणी 32 होती.
याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने याहवेहचा हिस्सा म्हणून एलअज़ार याजकाला खंडणी दिली.
युद्धास गेलेल्या सैनिकांशिवाय इस्राएली लोकांना जो वाटा मोशेने वेगळा केला—
इस्राएल समाजाला मिळालेला अर्धा वाटा याप्रमाणे होता—3,37,500 मेंढरे,