मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद १:१सुमारे इ.स.पू. १४५१

    इस्राएली लोक यार्देन नदीच्या पूर्वेस असणार्‍या रानातील अराबा नावाच्या दरीमध्ये तळ देऊन राहिले होते, त्यावेळी मोशे जे बोलला त्या सर्व गोष्टीची नोंद या पुस्तकात केलेली आहे. या प्रदेशात सूफ, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दीजाहाब इत्यादी शहरांचा समावेश होतो.

  2. अनुवाद १:२सुमारे इ.स.पू. १४५१

    (सेईर डोंगरमार्गे होरेब ते कादेश-बरनेआपर्यंतचा प्रवास अकरा दिवसाचा होता.)

  3. अनुवाद १:३सुमारे इ.स.पू. १४५१

    चाळिसाव्या वर्षाच्या, अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने इस्राएली लोकांना हे सर्व सांगितले.

  4. अनुवाद १:४सुमारे इ.स.पू. १४५१

    हे मोशेने जाहीर करण्यापूर्वीच अमोर्‍यांचा राजा सीहोनाचा हेशबोन येथे पराभव करण्यात आला होता व एद्रेई जवळील अष्टारोथ येथे बाशानचा राजा ओगचाही पराभव करण्यात आला होता.

  5. अनुवाद १:५सुमारे इ.स.पू. १४५१

    यार्देनच्या पूर्वेकडील मोआब प्रदेशात मोशे इस्राएली लोकांशी नियमांसंबंधी बोलला. तो म्हणाला:

  6. अनुवाद १:६सुमारे इ.स.पू. १४५१

    आपल्या याहवेह परमेश्वरांनी चाळीस वर्षांपूर्वी होरेब येथे आपल्याला सांगितले होते, “तुम्ही या पर्वताजवळ खूप दिवस राहिलात;

  7. अनुवाद १:७सुमारे इ.स.पू. १४५१

    आता तुम्ही येथून जा व अमोर्‍यांचा डोंगराळ प्रदेश, अराबाची दरी, नेगेव, कनान व लबानोन आणि भूमध्य समुद्रकिनार्‍यापासून ते फरात नदीच्या काठापर्यंत पसरलेल्या संपूर्ण प्रदेशात जाऊन वस्ती करा.

  8. अनुवाद १:८सुमारे इ.स.पू. १४५१

    पाहा, मी हा सर्व प्रदेश तुम्हाला देत आहे. तुम्ही जा व तो प्रदेश हस्तगत करा. कारण याहवेहने तो प्रदेश अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजास व त्यांच्या वंशजास दिलेला वचनदत्त देश आहे.”

  9. अनुवाद १:९सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे.

  10. अनुवाद १:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे अगणित केली आहे,

  11. अनुवाद १:११सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी जे तुम्हाला अभिवचन दिले होते, त्यानुसार तुमची संख्या हजारपटीने वाढवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो!

  12. अनुवाद १:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या समस्या, तुमचे ओझे व तुमची भांडणे माझ्यासारखा एकटा मनुष्य कसा सोडवू शकेल?

  13. अनुवाद १:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.”

  14. अनुवाद १:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही मला उत्तर देऊन म्हणाला, “तुम्ही जे करण्याचा प्रस्ताव दिला ते उत्तम आहे.”

  15. अनुवाद १:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोत्रांतून प्रमुख, ज्ञानी आणि आदरणीय पुरुष घेतले आणि त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.

  16. अनुवाद १:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो.

  17. अनुवाद १:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    न्याय करताना पक्षपातीपणा दाखवू नका; लहान व मोठे यांचे म्हणणे समानतेत ऐकून घ्या. कोणालाही घाबरू नका; कारण न्याय हा परमेश्वराकडूनच असतो. ज्या तक्रारी तुम्हाला सोडविण्यास कठीण वाटतील, त्या माझ्याकडे आणा आणि मी ऐकेन.”

  18. अनुवाद १:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि त्यावेळी मी तुम्हाला जे काही करावयाचे आहे ते सर्व सांगितले होते.

  19. अनुवाद १:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    नंतर आम्ही होरेब येथून प्रस्थान केले व जो तुम्ही पाहिला होता अशा अफाट आणि भयानक अशा अरण्यातून प्रवास करीत, याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे शेवटी अमोर्‍यांच्या डोंगराळ प्रदेशात पोहोचलो आणि आम्ही कादेश-बरनेआस आलो.

  20. अनुवाद १:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा मी तुम्हाला सांगितले, “आता तुम्ही अमोर्‍यांच्या डोंगराळ प्रदेशात येऊन पोहोचला आहात, जो याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देणार आहेत.

  21. अनुवाद १:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    पाहा, याहवेह तुमच्या परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. तुमच्या पूर्वजांचे देव परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे वर जा आणि तो आपल्या ताब्यात घ्या. घाबरू नका; निराश होऊ नका.”

  22. अनुवाद १:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा तुम्ही सर्व लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले, “आधी आपण आपले हेर पाठवू म्हणजे कुठल्या मार्गाने त्या देशात प्रवेश करावा व त्यांची कोणती शहरे लागतील हे शोधून काढणे सोपे होईल.”

  23. अनुवाद १:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    ही गोष्ट मला चांगली वाटली; म्हणून मी प्रत्येक गोत्रातून एक असे बारा हेर निवडले.

  24. अनुवाद १:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    तिथून निघून ते डोंगराळ प्रदेशात पोहोचले आणि ते अष्कोल दरीपर्यंत आले व त्यांनी त्या प्रदेशाची पाहणी केली.

  25. अनुवाद १:२५सुमारे इ.स.पू. १४५१

    तिथून परत येताना त्यांनी त्या ठिकाणची फळे आपल्याबरोबर आणली व असा अहवाल दिला: “जो देश याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत आहेत तो खरोखरच चांगला आहे.”