- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना १:५१सुमारे इ.स.पू. १४९०
ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे.
- गणना १:५२सुमारे इ.स.पू. १४९०
इस्राएली लोकांनी आपआपल्या दलानुसार, प्रत्येकाने आपआपल्या छावणीत, आपआपल्या झेंड्याखाली आपले डेरे द्यावे.
- गणना १:५३सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”
- गणना १:५४सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले.
- गणना २:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहने मोशे आणि अहरोनाला म्हटले:
- गणना २:२सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.”
- गणना २:३सुमारे इ.स.पू. १४९०
पूर्वेकडे, सूर्योदयाच्या दिशेने: यहूदाहच्या छावणीच्या दलांनी त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. यहूदाहच्या लोकांचा पुढारी अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा.
- गणना २:४सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 74,600 होती.
- गणना २:५सुमारे इ.स.पू. १४९०
इस्साखारचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देणार. इस्साखारच्या लोकांचा पुढारी सूवाराचा मुलगा नथानेल असावा.
- गणना २:६सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 54,400 होती.
- गणना २:७सुमारे इ.स.पू. १४९०
त्यानंतर जबुलूनचे गोत्र असणार. हेलोनचा पुत्र एलियाब हा जबुलूनच्या लोकांचा पुढारी आहे.
- गणना २:८सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 57,400 होती.
- गणना २:९सुमारे इ.स.पू. १४९०
यहूदाहच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार, संख्येने 1,86,400 होते. त्यांनी सर्वप्रथम निघावे.
- गणना २:१०सुमारे इ.स.पू. १४९०
दक्षिणेच्या बाजूस: रऊबेनच्या छावणीच्या दलाने त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा असावा. रऊबेनच्या लोकांचा पुढारी शेदेऊरचा पुत्र एलीसूर आहे.
- गणना २:११सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 46,500 होती.
- गणना २:१२सुमारे इ.स.पू. १४९०
शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे.
- गणना २:१३सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 59,300 होती.
- गणना २:१४सुमारे इ.स.पू. १४९०
त्यानंतर गाद गोत्र असेल. गादच्या लोकांचा पुढारी रऊएलाचा पुत्र एलीआसाफ आहे.
- गणना २:१५सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 45,650 होती.
- गणना २:१६सुमारे इ.स.पू. १४९०
रऊबेनच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,51,450 होते. ते दुसर्या रांगेत निघतील.
- गणना २:१७सुमारे इ.स.पू. १४९०
मग सभामंडप व लेव्यांची छावणी सर्व छावण्यांच्या मध्यभागी असणार. ज्या क्रमाने ते डेरा देऊन राहतात त्याच क्रमाने, आपल्या झेंड्याखाली आपआपल्या जागेवर त्यांनी निघावे.
- गणना २:१८सुमारे इ.स.पू. १४९०
पश्चिमेच्या बाजूस: एफ्राईमच्या दलाने आपल्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. एफ्राईमच्या लोकांचा पुढारी अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा आहे.
- गणना २:१९सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 40,500 होती.
- गणना २:२०सुमारे इ.स.पू. १४९०
मनश्शेहचे गोत्र त्यांच्यानंतर असेल. मनश्शेहच्या लोकांचा पुढारी पदहसूरचा पुत्र गमलीएल आहे.
- गणना २:२१सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 32,200 होती.