मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना २:२२सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यानंतर बिन्यामीनचे गोत्र असणार. बिन्यामीन लोकांचा पुढारी गिदयोनीचा पुत्र अबीदान आहे.

  2. गणना २:२३सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांच्या दलातील लोकांची संख्या 35,400 होती.

  3. गणना २:२४सुमारे इ.स.पू. १४९०

    एफ्राईमच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,08,100 होते. ते तिसर्‍या रांगेत निघतील.

  4. गणना २:२५सुमारे इ.स.पू. १४९०

    उत्तरेच्या बाजूस: दानच्या दलाने आपल्या झेंड्याखाली त्यांचा डेरा द्यावा. दान लोकांचा पुढारी अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर आहे.

  5. गणना २:२६सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांच्या दलातील लोकांची संख्या 62,700 होती.

  6. गणना २:२७सुमारे इ.स.पू. १४९०

    आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे.

  7. गणना २:२८सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांच्या दलातील लोकांची संख्या 41,500 होती.

  8. गणना २:२९सुमारे इ.स.पू. १४९०

    नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे.

  9. गणना २:३०सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांच्या दलातील लोकांची संख्या 53,400 होती.

  10. गणना २:३१सुमारे इ.स.पू. १४९०

    दानच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,57,600 होते. त्यांच्या झेंड्याखाली ते सर्वांच्या शेवटी निघतील.

  11. गणना २:३२सुमारे इ.स.पू. १४९०

    आपआपल्या घराण्यानुसार मोजलेले इस्राएली लोक हे आहेत. छावणीतील सर्व पुरुषांची संख्या 6,03,550 होती.

  12. गणना २:३३सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इतर इस्राएल लोकांबरोबर लेव्यांची मोजणी केली नव्हती.

  13. गणना २:३४सुमारे इ.स.पू. १४९०

    अशा रीतीने याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी प्रत्येक गोष्ट केली, ते असे की, आपआपल्या झेंड्याजवळ ते डेरे देत असत आणि आपले कूळ व घराणे यानुसार पुढे चालत असत.

  14. गणना ३:१सुमारे इ.स.पू. १४९०

    सीनाय डोंगरावर याहवेह मोशेबरोबर बोलले, त्यावेळी अहरोन व मोशे यांची वंशावळी ही होती.

  15. गणना ३:२सुमारे इ.स.पू. १४९०

    अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार.

  16. गणना ३:३सुमारे इ.स.पू. १४९०

    अहरोनाच्या ज्या पुत्रांचा याजक म्हणून अभिषेक करण्यात आला आणि निवासमंडपात सेवा करण्यासाठी समर्पित करण्यात आले, त्यांची ही वरील नावे होती.

  17. गणना ३:४सुमारे इ.स.पू. १४९०

    नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.

  18. गणना ३:५सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशेला म्हणाले,

  19. गणना ३:६सुमारे इ.स.पू. १४९०

    “लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर.

  20. गणना ३:७सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत.

  21. गणना ३:८सुमारे इ.स.पू. १४९०

    सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी.

  22. गणना ३:९सुमारे इ.स.पू. १४९०

    यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत.

  23. गणना ३:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याच्या पुत्रांची नेमणूक करावी. इतर दुसरे कोणी पवित्रस्थानाच्या जवळ आले, तर त्यास जिवे मारावे.”

  24. गणना ३:११सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि याहवेह मोशेला म्हणाले,

  25. गणना ३:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    “इस्राएली लोकांतील प्रत्येक स्त्रीच्या पोटी प्रथम जन्मलेल्या पुत्रांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. लेवी लोक माझे आहेत,