- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना ३:१३सुमारे इ.स.पू. १४९०
कारण सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. ज्या दिवशी इजिप्तमध्ये मी सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, त्या दिवशी इस्राएलातील प्रत्येक प्रथम जन्मलेले मी माझ्यासाठी समर्पित करून घेतले, ते मनुष्य असो किंवा पशू, ते माझे आहेत, मीच याहवेह आहे.”
- गणना ३:१४सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहने पुन्हा मोशेला सीनाय रानात सांगितले,
- गणना ३:१५सुमारे इ.स.पू. १४९०
“आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.”
- गणना ३:१६सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली.
- गणना ३:१७सुमारे इ.स.पू. १४९०
लेवीच्या पुत्रांची नावे ही: गेर्षोन, कोहाथ आणि मरारी.
- गणना ३:१८सुमारे इ.स.पू. १४९०
गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: लिब्नी आणि शिमी.
- गणना ३:१९सुमारे इ.स.पू. १४९०
कोहाथाची कुळे: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.
- गणना ३:२०सुमारे इ.स.पू. १४९०
मरारीची कुळे: महली आणि मूशी.
- गणना ३:२१सुमारे इ.स.पू. १४९०
लिब्नी व शिमी ही कुळे गेर्षोनापासून होती; ही गेर्षोनी कुळे होती.
- गणना ३:२२सुमारे इ.स.पू. १४९०
एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 7,500 होती.
- गणना ३:२३सुमारे इ.स.पू. १४९०
गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा.
- गणना ३:२४सुमारे इ.स.पू. १४९०
गेर्षोनी घराण्याचा प्रमुख लाएलचा पुत्र एलीआसाफ होता.
- गणना ३:२५सुमारे इ.स.पू. १४९०
सभामंडपात गेर्षोनी लोकांची जबाबदारी ही होती की, त्यांनी निवासमंडप व तंबू, त्याचे आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,
- गणना ३:२६सुमारे इ.स.पू. १४९०
आणि अंगणाचे पडदे, निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा आणि दोर्या व त्याच्या वापराशी संबंधित जे सर्वकाही आहे यांची काळजी घ्यावी.
- गणना ३:२७सुमारे इ.स.पू. १४९०
अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जीएली हे कोहाथी कुळाचे होते; ही कोहाथची कुळे होती.
- गणना ३:२८सुमारे इ.स.पू. १४९०
एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 8,600 होती. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी कोहाथी लोकांकडे होती.
- गणना ३:२९सुमारे इ.स.पू. १४९०
कोहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेकडे डेरे द्यायचे होते.
- गणना ३:३०सुमारे इ.स.पू. १४९०
उज्जीएलचा पुत्र एलीजाफान हा कोहाथी कुळांचा पुढारी होता.
- गणना ३:३१सुमारे इ.स.पू. १४९०
कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाच्या सेवेत वापरली जाणारी उपकरणे, पडदा आणि त्यांच्या वापराशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यास ते जबाबदार होते.
- गणना ३:३२सुमारे इ.स.पू. १४९०
अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ार हा लेवींचा प्रमुख पुढारी होता. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्यांवर त्याची नेमणूक करण्यात आली होती.
- गणना ३:३३सुमारे इ.स.पू. १४९०
महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती.
- गणना ३:३४सुमारे इ.स.पू. १४९०
एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती.
- गणना ३:३५सुमारे इ.स.पू. १४९०
अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.
- गणना ३:३६सुमारे इ.स.पू. १४९०
मरारी लोकांची नेमणूक निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, बैठका, त्याची सर्व उपकरणे आणि त्यांच्या वापरा संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी,
- गणना ३:३७सुमारे इ.स.पू. १४९०
तसेच अंगणाच्या आजूबाजूच्या बैठका, तंबूच्या मेखा आणि दोर्या यावर करण्यात आली होती.