- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना ३:३८सुमारे इ.स.पू. १४९०
मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.
- गणना ३:३९सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशे व अहरोन यांनी लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार एक महिन्याचे व अधिक वयाचे पुरुष यांची गणती केली, ते एकूण 22,000 होते.
- गणना ३:४०सुमारे इ.स.पू. १४९०
मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांतील एक महिन्याच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या सर्व पुरुषांची गणती करून त्यांच्या नावांची यादी करावी.
- गणना ३:४१सुमारे इ.स.पू. १४९०
आणि इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेव्यांना माझ्यासाठी घ्यावे आणि इस्राएली लोकांच्या पशूतील सर्व प्रथम जन्मलेल्या वत्सांऐवजी, लेव्याच्या पशूंना माझ्यासाठी घ्यावे. मीच याहवेह आहे.”
- गणना ३:४२सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली.
- गणना ३:४३सुमारे इ.स.पू. १४९०
एक महिना व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषांची एकूण संख्या 22,273 होती.
- गणना ३:४४सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला आणखी म्हणाले,
- गणना ३:४५सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी लोकांना घे आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घ्यावे. लेवी लोक माझे असावेत. मीच याहवेह आहे.
- गणना ३:४६सुमारे इ.स.पू. १४९०
273 इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले जे लेव्यांपेक्षा अधिक आहेत त्यांची खंडणी भरण्यासाठी,
- गणना ३:४७सुमारे इ.स.पू. १४९०
प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल घे; म्हणजेच वीस गेरा.
- गणना ३:४८सुमारे इ.स.पू. १४९०
आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.”
- गणना ३:४९सुमारे इ.स.पू. १४९०
मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले.
- गणना ३:५०सुमारे इ.स.पू. १४९०
इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांकडून त्याने पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार 1,365 गोळा केले.
- गणना ३:५१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.
- गणना ४:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला आणि अहरोनाला म्हणाले:
- गणना ४:२सुमारे इ.स.पू. १४९०
“लेवींच्या शाखेतील कोहाथी लोकांची त्यांच्या कुळांनुसार व घराण्यानुसार जनगणना करा.
- गणना ४:३सुमारे इ.स.पू. १४९०
म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आहेत, त्यांची गणती करावी.
- गणना ४:४सुमारे इ.स.पू. १४९०
“सभामंडपातील परमपवित्र वस्तूंची काळजी घेण्याचे काम कोहाथी लोकांचे आहे.
- गणना ४:५सुमारे इ.स.पू. १४९०
ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा.
- गणना ४:६सुमारे इ.स.पू. १४९०
मग त्यांनी तो पडदा टिकाऊ चर्माने झाकावा व त्यावर निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि कोशाचे दांडे त्याच्या जागी बसवावे.
- गणना ४:७सुमारे इ.स.पू. १४९०
“समक्षतेच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि त्यावर बशा, ताट, वाट्या आणि पेयार्पणासाठी कलश ठेवावे; आणि निरंतरची अर्पणाची भाकर त्यावर असावी.
- गणना ४:८सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे एक कापड पसरावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे व मेजाचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.
- गणना ४:९सुमारे इ.स.पू. १४९०
“यानंतर त्यांनी प्रकाश देणारा दीपस्तंभ व त्यावरील दिवे, वातीचे चिमटे व त्यांची तबके आणि जैतुनाच्या तेलाचे वाटप करण्यासाठी त्याचे सर्व कलश हे सर्व निळ्या कापडाने झाकावे.
- गणना ४:१०सुमारे इ.स.पू. १४९०
मग त्यांनी ती सगळी उपकरणे टिकाऊ चर्माच्या आच्छादनात गुंडाळून ते वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावे.
- गणना ४:११सुमारे इ.स.पू. १४९०
“मग त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे व ते टिकाऊ चर्माने झाकावे आणि वेदीचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.