मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ४:३७सुमारे इ.स.पू. १४९०

    सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व कोहाथी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  2. गणना ४:३८सुमारे इ.स.पू. १४९०

    गेर्षोनी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

  3. गणना ४:३९सुमारे इ.स.पू. १४९०

    सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,

  4. गणना ४:४०सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांचे कूळ व घराणे यानुसार ते 2,630 होते.

  5. गणना ४:४१सुमारे इ.स.पू. १४९०

    सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व गेर्षोनी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  6. गणना ४:४२सुमारे इ.स.पू. १४९०

    मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

  7. गणना ४:४३सुमारे इ.स.पू. १४९०

    सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,

  8. गणना ४:४४सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांच्या कुळानुसार ते 3,200 गणले गेले.

  9. गणना ४:४५सुमारे इ.स.पू. १४९०

    सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व मरारी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

  10. गणना ४:४६सुमारे इ.स.पू. १४९०

    मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या पुढार्‍यांनी सर्व लेवींची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

  11. गणना ४:४७सुमारे इ.स.पू. १४९०

    सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,

  12. गणना ४:४८सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांची संख्या 8,580 भरली.

  13. गणना ४:४९सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकाला आपले काम व त्यांनी काय वाहून न्यावे हे नेमून देण्यात आले. अशाप्रकारे याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाची गणती करण्यात आली.

  14. गणना ५:१सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेहने मोशेला म्हटले,

  15. गणना ५:२सुमारे इ.स.पू. १४९०

    इस्राएली लोकांना आज्ञा दे की, ज्यांना चर्मरोग आहे किंवा कोणत्याही प्रकारचा स्राव आहे किंवा जो मृतदेहाच्या विधीमुळे अशुद्ध झाला आहे, त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे.

  16. गणना ५:३सुमारे इ.स.पू. १४९०

    मग ते स्त्री असो किंवा पुरुष; त्यांना बाहेर पाठवावे. ज्या छावणीत मी तुमच्यामध्ये राहतो, ती त्यांच्यामुळे भ्रष्ट होऊ नये, म्हणून त्यांना बाहेर पाठवावे.

  17. गणना ५:४सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले; त्यांनी त्यांना छावणीबाहेर पाठविले. याहवेहने मोशेला सूचना दिली होती तसेच त्यांनी केले.

  18. गणना ५:५सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशेला म्हणाले,

  19. गणना ५:६सुमारे इ.स.पू. १४९०

    “इस्राएली लोकांस सांग, ‘जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री एखाद्याविरुद्ध कोणताही अपराध करेल, तो याहवेहच्या विरुद्ध विश्वासघात असून तो दोषी आहे.

  20. गणना ५:७सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांनी केलेले पाप कबूल करावे. त्यांनी केलेल्या पापाची पूर्ण भरपाई करून द्यावी, त्यात त्याचा पाचवा भाग मिळवून ज्या व्यक्तीविरुद्ध पाप केला आहे त्याला द्यावा.

  21. गणना ५:८सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु पापाची भरपाई करण्यासाठी त्या व्यक्तीचा कोणीही जवळचा नातेवाईक नसेल तर ती भरपाई याहवेहची असावी आणि पापासाठी प्रायश्चित करण्याच्या मेंढ्यासह ती याजकाकडे द्यावी.

  22. गणना ५:९सुमारे इ.स.पू. १४९०

    सर्व पवित्र भेटी, ज्या इस्राएली लोक याजकाकडे आणतात त्या याजकाच्या व्हाव्या.

  23. गणना ५:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    पवित्र वस्तू त्यांच्या मालकाच्या आहेत, परंतु ते जे याजकाला देतात, ते याजकाच्या मालकीचे होईल.’ ”

  24. गणना ५:११सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  25. गणना ५:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जर एखाद्या मनुष्याच्या पत्नीचे वाकडे पाऊल पडले आणि ती त्याच्याशी अविश्वासूपणे वागली,