मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ५:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    जेणेकरून दुसर्‍या पुरुषाचे तिच्याशी लैंगिक संबंध असले आणि हे तिच्या पतीपासून गुपित असेल आणि तिची अशुद्धता उघडकीस आली नाही (कारण तिच्याविरुद्ध कोणीही साक्षीदार नाही आणि ती त्या कृत्यात पकडली गेली नाही),

  2. गणना ५:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि जर तिच्या पतीला मत्सराची भावना झाली आणि तो आपल्या पत्नीवर संशय घेतो की ती अशुद्ध आहे—किंवा त्याच्या मनात मत्सराची भावना निर्माण झाली आणि ती जरी अशुद्ध नसली तरीही तो संशय घेतो—

  3. गणना ५:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    तर त्याने आपल्या पत्नीला याजकाकडे न्यावे. त्याने तिच्या वतीने सोबत एक एफाचा दहावा भाग जवाचे पीठ आणावे. त्याने त्यावर जैतुनाचे तेल ओतू नये किंवा त्यावर धूप ठेवू नये, कारण हे मत्सरासाठी केलेले अन्नार्पण आहे, अपराधाची आठवण देणारे स्मरणाचे अर्पण आहे.

  4. गणना ५:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘याजकाने त्या स्त्रीला आणावे आणि तिला याहवेहसमोर उभे करावे.

  5. गणना ५:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे आणि निवासमंडपाच्या भूमीवरील थोडी धूळ घेऊन त्या पाण्यात टाकावी.

  6. गणना ५:१८सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर याजकाने तिला याहवेहपुढे उभे केल्यानंतर, त्याने तिचे केस मोकळे सोडावे आणि तिच्या स्मरणाचे अर्पण, मत्सरासाठी केलेले अन्नार्पण तिच्या हातावर ठेवावे व त्याने शाप आणणारे कडू पाणी आपल्या हाती घ्यावे.

  7. गणना ५:१९सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, “जर कोणी पुरुषाने तुझ्याशी लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत आणि तू आपल्या पतीशी विवाहित असताना निर्दोष असून वाकडे पाऊल टाकले नाही, तर या कडू पाण्यापासून मिळणारा शाप तुला अपाय न करो.

  8. गणना ५:२०सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु जर तू तुझ्या पतीशी विवाहित असतानाही वाकडे पाऊल टाकले आहे आणि आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवून स्वतःला भ्रष्ट केले आहेस—

  9. गणना ५:२१सुमारे इ.स.पू. १४९०

    यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो.

  10. गणना ५:२२सुमारे इ.स.पू. १४९०

    शाप देणारे हे पाणी तुझ्या शरीरात जावो, म्हणजे तुझे पोट फुगेल किंवा तुझा गर्भपात होईल.” “ ‘मग त्या स्त्रीने म्हणावे, “आमेन. असेच होवो.”

  11. गणना ५:२३सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘तेव्हा याजकाने हे शापाचे शब्द एका गुंडाळीवर लिहून ते शब्द त्या कडू पाण्यात धुवावे.

  12. गणना ५:२४सुमारे इ.स.पू. १४९०

    ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल.

  13. गणना ५:२५सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे.

  14. गणना ५:२६सुमारे इ.स.पू. १४९०

    त्या अन्नार्पणाचे प्रतीक म्हणून याजकाने त्या अर्पणातील मूठभर अन्न घेऊन ते वेदीवर जाळावे; व त्यानंतर त्याने ते पाणी त्या स्त्रीला प्यायला द्यावे.

  15. गणना ५:२७सुमारे इ.स.पू. १४९०

    जर ती आपल्या पतीशी अविश्वासू राहून तिने स्वतःला भ्रष्ट केले असेल, तर त्याचा परिणाम असा असेल: जेव्हा तिला ते शाप आणि कडवट कष्ट आणणारे पाणी पाजले जाईल, ते तिच्या शरीरात जाईल, तिचे पोट फुगेल आणि तिचे उदर गर्भपात करेल आणि ती शापित होईल.

  16. गणना ५:२८सुमारे इ.स.पू. १४९०

    पण त्या स्त्रीने जर स्वतःला भ्रष्ट केलेले नाही आणि ती शुद्ध असेल, तर ती निर्दोष ठरविली जाईल आणि तिला मुलेबाळे होतील.

  17. गणना ५:२९सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीशी विवाहित असतानाही स्वतःला भ्रष्ट करते तेव्हा हा मत्सराचा नियम असावा,

  18. गणना ५:३०सुमारे इ.स.पू. १४९०

    किंवा जेव्हा एखाद्या पुरुषाच्या मनात मत्सराची भावना येते, कारण तो आपल्या पत्नीवर संशय घेतो, याजकाने तिला याहवेहसमोर उभे करावे आणि हा संपूर्ण नियम तिला लागू करावा.

  19. गणना ५:३१सुमारे इ.स.पू. १४९०

    तिचा पती कोणत्याही अन्यायापासून निर्दोष असेल, परंतु ती स्त्री आपल्या पापाचे परिणाम भोगेल.’ ”

  20. गणना ६:१सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  21. गणना ६:२सुमारे इ.स.पू. १४९०

    “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: एखादा पुरुष किंवा स्त्री याहवेहला समर्पित नाजीर होण्याचा एक विशेष नवस करू इच्छितात,

  22. गणना ६:३सुमारे इ.स.पू. १४९०

    तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.

  23. गणना ६:४सुमारे इ.स.पू. १४९०

    जोपर्यंत ते नाजीराच्या नवसाखाली असतील, तोपर्यंत त्यांनी द्राक्षवेलीचा कोणताही उपज, साल व बीज सुद्धा खाऊ नये.

  24. गणना ६:५सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘नाजीरपणाच्या संपूर्ण काळात त्यांच्या डोक्यावर वस्तरा फिरवू नये. त्यांनी याहवेहला समर्पित केलेला नवसाच्या काळ संपेपर्यंत त्यांनी पवित्र असावे; त्यांनी आपले केस लांब वाढू द्यावेत.

  25. गणना ६:६सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘याहवेहला समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत, नाजीराने मृतदेहाजवळ जाऊ नये.