मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ६:७सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांचे स्वतःचे वडील किंवा आई किंवा भाऊ किंवा बहीण जरी मरण पावले, तरीही त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःला विधिपूर्वक अशुद्ध करू नये, कारण परमेश्वराला समर्पित केल्याचे प्रतीक त्यांच्या डोक्यावर आहे.

  2. गणना ६:८सुमारे इ.स.पू. १४९०

    समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत ते याहवेहसाठी पवित्र आहेत.

  3. गणना ६:९सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘जर नाजीराच्या समक्षतेत कोणी अचानक मरण पावला, तर त्यांच्या डोक्यावरील केस, समर्पणाचे प्रतीक विटाळले जाते, त्यावेळी सातव्या दिवशी; शुद्धीकरणाच्या दिवशी त्यांनी आपले मुंडण करावे.

  4. गणना ६:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    मग आठव्या दिवशी त्यांनी दोन कबुतरे किंवा पारव्यांची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी.

  5. गणना ६:११सुमारे इ.स.पू. १४९०

    मग नाजीरासाठी याजकाने त्यापैकी एक पापार्पण व दुसरा होमार्पणाचे प्रायश्चित म्हणून अर्पण करावा, कारण मृतदेहाच्या समक्षतेत राहून त्यांनी पाप केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा आपले डोके पवित्र करावे.

  6. गणना ६:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि त्यांनी आपला नाजीरपणाचा काळ याहवेहसाठी पुनर्समर्पित करावा आणि दोषार्पण म्हणून एक वर्षाचा कोकरा आणावा. आधीचे दिवस मोजले जाणार नाही, कारण त्यांच्या समर्पित असलेल्या काळात ते विटाळले गेले.

  7. गणना ६:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘आणि त्यांचा समर्पणाचा काळ संपल्यानंतर नाजीरांसाठी हा नियम असावा. त्यांना सभामंडपाच्या दाराशी आणावे,

  8. गणना ६:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    त्या ठिकाणी त्यांनी याहवेहसाठी ही अर्पणे सादर करावी: होमार्पणासाठी एक वर्षाचा निर्दोष कोकरा व पापार्पणासाठी मेंढी आणावी व शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी निर्दोष गोर्‍हा आणावा.

  9. गणना ६:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याबरोबर त्यांचे अन्नार्पण व पेयार्पण आणि एक टोपलीभर सपिठाची आणि बेखमीर भाकरी—जैतुनाच्या तेलात मळलेल्या जाड भाकरी व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी आणाव्या.

  10. गणना ६:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘याजकाने ही अर्पणे याहवेहसमोर सादर करून पापार्पण व होमार्पण करावे.

  11. गणना ६:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने बेखमीर भाकरीची टोपली सादर करावी व अन्नार्पण व पेयार्पण याबरोबर याहवेहसाठी शांत्यर्पण म्हणून गोर्‍हाचा यज्ञ करावा.

  12. गणना ६:१८सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘मग नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे, ते सभामंडपाच्या दारात मुंडवावे. मग ते केस घेऊन त्यांनी शांत्यर्पणाखाली असलेल्या अग्नीत टाकावे.

  13. गणना ६:१९सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे ते मुंडण केल्यानंतर, याजकाने त्यांच्या हातात गोर्‍हाचा उकळलेला खांद्याचा भाग व खमीर न घालता बनविलेल्या दोन्ही, एक जाड व एक पातळ भाकर ठेवावी.

  14. गणना ६:२०सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर याजकाने ते हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहपुढे ओवाळावे; ते पवित्र आहे; त्याचबरोबर ओवाळलेला उराचा भाग आणि सादर केलेला मांडीचा भाग याजकासाठी असावा. यानंतर नाजीर द्राक्षारस पिऊ शकतो.

  15. गणना ६:२१सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘हा नाजीराचा नियम आहे, जे आपल्या समर्पणानुसार याहवेहला अर्पण करण्याचा नवस करतात, त्या खेरीज त्यांना परवडेल त्यानुसार आणावे. नाजीराच्या नियमानुसार केलेले नवस त्यांनी पूर्ण केले पाहिजे.’ ”

  16. गणना ६:२२सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशेला म्हणाले,

  17. गणना ६:२३सुमारे इ.स.पू. १४९०

    अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:

  18. गणना ६:२४सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘ “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो;

  19. गणना ६:२५सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो;

  20. गणना ६:२६सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, आणि तुम्हाला शांती देवो.” ’

  21. गणना ६:२७सुमारे इ.स.पू. १४९०

    “अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन.”

  22. गणना ७:१सुमारे इ.स.पू. १४९०

    जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली.

  23. गणना ७:२सुमारे इ.स.पू. १४९०

    मग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली.

  24. गणना ७:३सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्‍यामागे एक बैल आणि दोन पुढार्‍यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले.

  25. गणना ७:४सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेहने मोशेला म्हटले,