- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- अनुवाद ३३:२०सुमारे इ.स.पू. १४५१
गादाविषयी तो म्हणाला: “धन्य आहे गादाचा विस्तार! गाद सिंहासारखा जीवन जगतो, झडप घालून तो भुजा आणि डोके फोडतो.
- अनुवाद ३३:२१सुमारे इ.स.पू. १४५१
त्याने स्वतःसाठी सर्वाेत्तम अशी भूमी निवडली आहे; पुढार्यासाठी राखून ठेवलेली जमीन त्याला मिळाली आहे. वंशपित्यांच्या सभेत त्याने इस्राएलाकरिता याहवेहच्या नीतिपर इच्छेचे आणि याहवेहच्या न्यायाचे पालन केले.”
- अनुवाद ३३:२२सुमारे इ.स.पू. १४५१
दानाविषयी तो म्हणाला: “दान हा सिंहाच्या छाव्यासारखा आहे, बाशानातून तो सिंहासारखी झेप घेतो.”
- अनुवाद ३३:२३सुमारे इ.स.पू. १४५१
नफताली विषयी तो म्हणाला: “नफताली याहवेहच्या सर्व आशीर्वादांनी तृप्त आहे आणि त्यांच्या कृपेत परिपूर्ण आहे; तो सागरापर्यंतचा दक्षिण भाग वतन करून घेईल.”
- अनुवाद ३३:२४सुमारे इ.स.पू. १४५१
आशेराविषयी तो म्हणाला: “आशेर हा पुत्रांपैकी सर्वात धन्य आहे; त्याला सर्व भावांची कृपादृष्टी प्राप्त होवो आणि त्याचे पाय तेलाने धुतले जावोत.
- अनुवाद ३३:२५सुमारे इ.स.पू. १४५१
लोखंड आणि काशांच्या अडसरांनी त्याच्या शहराचे रक्षण होवो, आणि तुझे सामर्थ्य तुझ्या जीवनमानाइतके असो.
- अनुवाद ३३:२६सुमारे इ.स.पू. १४५१
“यशुरूनच्या परमेश्वरासमान कोणी नाही, ते आपल्या वैभवाच्या मेघावर आरूढ होऊन, आकाशमंडळातून तुझ्या साहाय्यार्थ धावून येतात.
- अनुवाद ३३:२७सुमारे इ.स.पू. १४५१
सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे, आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत. तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात, ‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात.
- अनुवाद ३३:२८सुमारे इ.स.पू. १४५१
म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल; याकोबास संरक्षण प्राप्त होईल, धान्य आणि नव्या द्राक्षारसाने समृद्ध असलेल्या आणि आकाशातील जलांच्या दवबिंदूंनी सिंचित होणार्या भूमीत तो सुरक्षित राहील.
- अनुवाद ३३:२९सुमारे इ.स.पू. १४५१
इस्राएला, तू आशीर्वादित आहेस! इतर कोणत्या लोकांना याहवेहने वाचविले आहे काय? तेच तुझी ढाल व तुझे साहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. तुझे शत्रू तुझ्यापुढे थरथर कापतील, आणि तू त्यांची उच्च स्थाने पायाखाली तुडवशील!”
- अनुवाद ३४:१सुमारे इ.स.पू. १४५१
नंतर मोशे मोआबाच्या सपाट मैदानातून यरीहोच्या समोरील नबो पर्वताच्या पिसगा नामक शिखरावर चढून गेला. तिथून सभोवार—गिलआदापासून दानपर्यंतचा—सर्व प्रदेश याहवेहने त्याला दाखविला,
- अनुवाद ३४:२सुमारे इ.स.पू. १४५१
नफतालीचा संपूर्ण प्रदेश, एफ्राईम आणि मनश्शेह यांचे प्रदेश, त्यांच्या पलीकडे भूमध्य समुद्रापर्यंत पसरलेला तो यहूदीयाचा सर्व प्रदेश,
- अनुवाद ३४:३सुमारे इ.स.पू. १४५१
नेगेव प्रांत व यार्देनेचे खोरे! आणि खजुरीच्या झाडांचे यरीहो शहर, सोअर प्रांतापर्यंत.
- अनुवाद ३४:४सुमारे इ.स.पू. १४५१
मग याहवेह त्याला म्हणाले, “हाच तो वचनदत्त देश होय, ज्याचे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथपूर्वक वचन देऊन मी म्हटले होते, ‘मी हा देश त्यांच्या वंशजांना देईन.’ आता त्याला तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेस, परंतु तू त्यात प्रवेश करणार नाहीस.”
- अनुवाद ३४:५सुमारे इ.स.पू. १४५१
आणि याहवेहने सांगितल्याप्रमाणे, याहवेहचा सेवक मोशे मोआब देशात मरण पावला.
- अनुवाद ३४:६सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेहने त्याला मोआब देशातील बेथ-पौरजवळील खोर्यात पुरले, पण आजपर्यंत त्याला पुरले ते ठिकाण नक्की कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही.
- अनुवाद ३४:७सुमारे इ.स.पू. १४५१
मृत्युसमयी मोशे एकशेवीस वर्षांचा होता तरीही त्याची दृष्टी कमी झाली नव्हती, की त्याची शक्ती कमी झाली नव्हती.
- अनुवाद ३४:८सुमारे इ.स.पू. १४५१
इस्राएली लोकांनी मोआबाच्या मैदानात मोशेसाठी विलाप करण्याचे तीस दिवस पूर्ण होईपर्यंत शोक केला.
- अनुवाद ३४:९सुमारे इ.स.पू. १४५१
नूनाचा पुत्र यहोशुआ हा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याजवर आपले हात ठेवले होते. म्हणून इस्राएली लोकांनी त्याचे ऐकले आणि याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा ते पाळीत असत.
- अनुवाद ३४:१०सुमारे इ.स.पू. १४५१
मोशेसारखा संदेष्टा इस्राएलात पूर्वी झाला नाही, कारण याहवेह त्याच्याशी समोरासमोर बोलत असत,
- अनुवाद ३४:११सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेहच्या आज्ञेवरून त्याने इजिप्तमध्ये फारोह—त्याच्या दरबारातील लोक व संपूर्ण देशात आश्चर्यकारक चमत्कार केले.
- अनुवाद ३४:१२सुमारे इ.स.पू. १४५१
मोशेने इस्राएलसमोर जे महान सामर्थ्यशाली किंवा भयावह चमत्कार केले ते चमत्कार इतर कोणीही केले नाही.