मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण हे केवळ पोकळ शब्द नाहीत—तर ते तुमचे जीवन आहे. त्याद्वारे यार्देनेच्या पलीकडे असलेला जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुम्ही दीर्घकाल जगाल.”

  2. अनुवाद ३२:४८सुमारे इ.स.पू. १४५१

    त्याच दिवशी याहवेह मोशेला म्हणाले,

  3. अनुवाद ३२:४९सुमारे इ.स.पू. १४५१

    “तू मोआब देशात यरीहो पलीकडे असलेल्या अबारीम पर्वतातील नबो शिखराकडे जा, त्याच्यावर चढून समोर पसरलेला जो देश मी इस्राएली लोकांना त्यांचे स्वतःचे वतन म्हणून देणार आहे, त्या कनान देशाकडे नजर टाक.

  4. अनुवाद ३२:५०सुमारे इ.स.पू. १४५१

    तुझा भाऊ अहरोन होर पर्वतावर मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला, तसा तू देखील नबो पर्वतावर चढून गेल्यावर व कनान देश पाहिल्यावर मरशील आणि आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील.

  5. अनुवाद ३२:५१सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण सीनच्या अरण्यात कादेशच्या मरीबाह नावाच्या झर्‍याजवळ इस्राएली लोकांसमक्ष तू आणि अहरोनाने माझा विश्वासघात करून माझ्या पवित्रतेला आदर दिला नाही.

  6. अनुवाद ३२:५२सुमारे इ.स.पू. १४५१

    तर तो देश तू दुरून पाहशील; पण मी जो देश इस्राएली लोकांना देणार आहे, त्यात तू प्रवेश करणार नाहीस.”

  7. अनुवाद ३३:१सुमारे इ.स.पू. १४५१

    परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.

  8. अनुवाद ३३:२सुमारे इ.स.पू. १४५१

    तो म्हणाला: “याहवेह सीनाय पर्वतावरून आले आणि सेईरावर ते सूर्याप्रमाणे उदय पावले; पारान पर्वतावरून ते प्रकाशले. असंख्य पवित्र जनांचा समुदाय त्यांच्याबरोबर होता. दक्षिण दिशेने, त्यांच्या पर्वत उतरणीवरून ते खाली आले.

  9. अनुवाद ३३:३सुमारे इ.स.पू. १४५१

    निश्चित तुम्हीच आपल्या लोकांवर प्रीती करता; सर्व पवित्रजन तुमच्या अधीन आहेत. ते तुमच्या चरणाशी नमन करतात, आणि तुमच्याकडून ते आज्ञा स्वीकारतात,

  10. अनुवाद ३३:४सुमारे इ.स.पू. १४५१

    मोशेने आम्हाला जे नियम दिले, ते नियम याकोबाच्या सभेचे अमोल वतन आहे.

  11. अनुवाद ३३:५सुमारे इ.स.पू. १४५१

    इस्राएलच्या गोत्रांबरोबर जेव्हा इस्राएलच्या लोकांचे पुढारी एकत्र जमले, तेव्हा याहवेह यशुरून लोकांचे राज्यकर्ता झाले.

  12. अनुवाद ३३:६सुमारे इ.स.पू. १४५१

    “रऊबेन जिवंत राहो व त्यास मृत्यू न येवो, त्याची माणसे कमी न होवोत.”

  13. अनुवाद ३३:७सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि तो यहूदाहबद्दल असे म्हणाला: “हे याहवेह, यहूदाहचा धावा ऐका; आणि त्याला आपल्या लोकांजवळ आणा. स्वतःच्या हाताने ते त्याचे संरक्षण करतात, तुम्हीच त्याच्यासाठी त्याच्या शत्रूविरुद्ध साहाय्य व्हा!”

  14. अनुवाद ३३:८सुमारे इ.स.पू. १४५१

    मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्‍याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.

  15. अनुवाद ३३:९सुमारे इ.स.पू. १४५१

    आपले आई आणि वडील यांच्याबद्दल त्याने म्हटले, ‘ते माझे कोणीही नाहीत.’ त्याने आपल्या बांधवांना ओळखले नाही, किंवा आपल्या संततीस ओळखले नाही, परंतु त्याने तुमच्या आज्ञांचे पालन केले, आणि तुमच्या कराराशी ते प्रामाणिक राहिले.

  16. अनुवाद ३३:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील.

  17. अनुवाद ३३:११सुमारे इ.स.पू. १४५१

    हे याहवेह, त्यांचे सर्व कौशल्य आशीर्वादित करा, आणि त्यांची हस्तकृती तुम्हाला प्रसन्न करो. त्यांच्याविरुद्ध जे उठतात त्यांना चिरडून टाका, आणि ते पुन्हा उठणार नाहीत, असे करा.”

  18. अनुवाद ३३:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    मोशे बिन्यामीनाबद्दल म्हणाला: “याहवेहचा लाडका त्यांच्याजवळ सुरक्षित राहो, कारण दिवसभर याहवेह त्याची ढाल होऊन त्याला आपली सुरक्षा प्रदान करतात, आणि जो याहवेहला प्रिय आहे तो त्यांच्या दोन्ही खांद्यामध्ये सुरक्षित आहे.”

  19. अनुवाद ३३:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    तो योसेफाबद्दल म्हणाला: “याहवेह स्वर्गातील मौल्यवान दवाने, आणि पृथ्वीच्या खोलात असलेल्या जलाने त्याच्या भूमीला आशीर्वादित करोत;

  20. अनुवाद ३३:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    सूर्यप्रकाशाने मिळणारे उत्तम उत्पादन, आणि चंद्राच्या प्रभावाने मिळणाऱ्या उत्तम गोष्टी त्याला प्राप्त होवो;

  21. अनुवाद ३३:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    प्राचीन पर्वतामधून प्राप्त होणार्‍या सर्वोत्तम वस्तूंनी आणि सनातन डोंगरातून मिळणार्‍या निवडक फळांनी भरून जावो;

  22. अनुवाद ३३:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    जी पृथ्वीच्या विपुलतेची सर्वोत्तम भेट, आणि जळत्या झुडूपातून बोलणार्‍या त्या प्रभूच्या कृपादृष्टीने तो समृद्ध होवो. योसेफाच्या व त्याच्या वंशजाच्या मस्तकावर हे सर्व आशीर्वाद येवोत, जो आपल्या भाऊबंदांत प्रमुख होता.

  23. अनुवाद ३३:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    प्रथम जन्मलेल्या बैलासारखे त्याचे वैभव आहे; त्याची शिंगे रानबैलाची शिंगे आहेत, त्या शिंगानी तो राष्ट्रांना, पृथ्वीच्या दिगंती असलेल्यांना देखील भोसकतो. एफ्राईमाचे लाखो वंशज आणि मनश्शेहचे हजारो वंशज असे आहेत.”

  24. अनुवाद ३३:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    जबुलूनाविषयी तो म्हणाला: “जबुलूना, तुझा प्रवास तुझ्यासाठी आनंदाचा होवो आणि तू इस्साखारा, आपल्या डेऱ्यात उल्हास करो.

  25. अनुवाद ३३:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    ते लोकांना डोंगरावर बोलवतील व तिथे न्याययुक्त अशी यज्ञार्पणे वाहतील; समुद्रातून मिळविलेल्या उत्पन्नाचे ते स्वामी होतील, वाळूतून आपले गुप्तधन काढतील.”