- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना ४:१२सुमारे इ.स.पू. १४९०
“पवित्रस्थानाच्या सेवेसाठी वापरात आणली जाणारी सर्व पात्रे निळ्या कापडात गुंडाळावीत व त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि ती वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावी.
- गणना ४:१३सुमारे इ.स.पू. १४९०
“कास्य वेदीवरील सर्व राख काढावी आणि वेदी जांभळ्या रंगाच्या कापडाने झाकावी.
- गणना ४:१४सुमारे इ.स.पू. १४९०
मग वेदीच्या सेवेसाठी वापरात येणारी सर्व पात्रे म्हणजे अग्निपात्रे, मांसाचे काटे, फावडी आणि शिंपडण्याचे कटोरे त्यावर ठेवावे. मग त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि त्याचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.
- गणना ४:१५सुमारे इ.स.पू. १४९०
“नंतर अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी सर्व पवित्र साहित्य व पवित्र उपकरणे यावर आच्छादन घालण्याचे काम संपविल्यावर, जेव्हा छावणी पुढे जाण्यास सज्ज होईल, त्याचवेळी कोहाथी कुळाने ते वाहून नेण्यास पुढे यावे. परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये, नाहीतर ते मरतील. कोहाथी लोकांनी सभामंडपातील वस्तू वाहून न्यावयाच्या आहेत.
- गणना ४:१६सुमारे इ.स.पू. १४९०
“दिव्याचे तेल, सुगंधी धूप, रोजचे अन्नार्पण व अभिषेकाचे तेल, संपूर्ण निवासमंडप आणि त्यातील सर्व साहित्य, त्याचे पवित्र साहित्य व उपकरणे यांची जबाबदारी अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारकडे असावी.”
- गणना ४:१७सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहने मोशे व अहरोन यांना म्हटले,
- गणना ४:१८सुमारे इ.स.पू. १४९०
“कोहाथी गोत्राच्या कुळाचा लेव्यांमधून नाश होऊ नये,
- गणना ४:१९सुमारे इ.स.पू. १४९०
आणि ते जेव्हा परमपवित्र वस्तूंच्या जवळ येतात तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासाठी असे करावे: अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी पवित्रस्थानात जावे आणि प्रत्येकाने काय वाहून न्यावे हे त्यांना दाखवावे.
- गणना ४:२०सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु कोहाथी लोकांनी पवित्र वस्तू पाहण्यासाठी एक क्षणभरही आत जाऊ नये. नाहीतर ते मरण पावतील.”
- गणना ४:२१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- गणना ४:२२सुमारे इ.स.पू. १४९०
गेर्षोनी लोकांची त्यांचे घराणे व कूळ यानुसार जनगणना करावी.
- गणना ४:२३सुमारे इ.स.पू. १४९०
म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करावी.
- गणना ४:२४सुमारे इ.स.पू. १४९०
“वाहून नेणे व त्यांची इतर कामे करणे, ही गेर्षोनी कुळांची सेवा आहे:
- गणना ४:२५सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांनी निवासमंडपाचे पडदे, सभामंडप व त्याचे आच्छादन व त्याचे टिकाऊ चर्माचे बाहेरील आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा वाहून न्यावा.
- गणना ४:२६सुमारे इ.स.पू. १४९०
निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, दोर्या आणि मंडपातील सेवा करण्यासाठी वापरलेली सर्व उपकरणे. या संबंधीच्या ज्यागोष्टी करण्याची गरज आहे, त्या गेर्षोनी लोकांनी कराव्यात.
- गणना ४:२७सुमारे इ.स.पू. १४९०
गेर्षोनी लोकांनी सर्व सेवा, वाहून नेण्यासंबंधी असो किंवा इतर कामे असो, ती अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडावी. त्यांनी जे काही वाहून न्यायचे आहे ते त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून तू नेमून द्यावे.
- गणना ४:२८सुमारे इ.स.पू. १४९०
सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत.
- गणना ४:२९सुमारे इ.स.पू. १४९०
“मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती करावी.
- गणना ४:३०सुमारे इ.स.पू. १४९०
म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती करावी.
- गणना ४:३१सुमारे इ.स.पू. १४९०
सभामंडपातील त्यांच्या सेवेचा भाग म्हणून, त्यांनी निवासमंडपाच्या फळ्या, त्याची अडसरे, खांब आणि बैठका वाहून न्याव्या,
- गणना ४:३२सुमारे इ.स.पू. १४९०
त्याचप्रमाणे सभोवतालच्या अंगणाचे खांब, त्यांच्या बैठका, मेखा, दोर्या, त्याची सर्व उपकरणे आणि त्याच्या वापरासंबंधीचे सर्व साहित्य न्यावे. ज्या पुरुषाने जी ठराविक वस्तू वाहून न्यावयाची आहे ती त्याला नेमून द्यावी.
- गणना ४:३३सुमारे इ.स.पू. १४९०
अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.”
- गणना ४:३४सुमारे इ.स.पू. १४९०
मोशे, अहरोन आणि समुदायाच्या पुढार्यांनी कोहाथी लोकांची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.
- गणना ४:३५सुमारे इ.स.पू. १४९०
सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,
- गणना ४:३६सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांची संख्या कुळांनुसार 2,750 होती.