Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: 1 Timothy 5:18, »The labourer is worthy of his reward.«
1 Timothy 5:18, »The labourer is worthy of his reward.« बद्दल वचने
“ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.
गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.
त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.
कारण पवित्रशास्त्र म्हणते, “बैल धान्याची मळणी करीत असताना, त्याला मुसके बांधू नको” आणि “कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे!”