मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: John 15:25, »They hated me without a cause.«

6 वचने · 252 पैलू

John 15:25, »They hated me without a cause.« बद्दल वचने

  1. जे विनाकारण माझे शत्रू बनले आहेत, त्यांना आता माझा उपहास करण्यात आनंद करू देऊ नका; निष्कारण जे माझे विरोधी झाले आहेत त्यांना डोळे मिचकाविण्याची संधी देऊ नका.

  2. माझा विनाकारण द्वेष करणार्‍यांची संख्या माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा अधिक आहेत; पुष्कळ लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत. मला नष्ट करण्याची त्यांची इच्छा आहे. मी जे चोरले नाही, त्याची भरपाई करण्याची माझ्यावर बळजबरी होत आहे.

  3. त्यांनी द्वेषपूर्ण शब्दांचा माझ्यावर वर्षाव केला; विनाकारण ते माझ्यावर हल्ला करतात.

  4. अधिपतींनी कारण नसताना माझा छळ केला, परंतु माझे हृदय केवळ तुमच्याच वचनांनी कंपित होते.

  5. जे विनाकारण माझे शत्रू बनले होते, त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे.

  6. ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,’ असे त्यांच्या नियमात जे म्हटले आहे, ते पूर्ण झाले आहे.