मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: 1 Peter 3:10, »For he that will love life...«

8 वचने · 252 पैलू

1 Peter 3:10, »For he that will love life...« बद्दल वचने

  1. तुमच्यापैकी जो जीवनावर प्रीती करतो आणि अनेक चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो,

  2. तर तू आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.

  3. वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर; शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग.

  4. याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात.

  5. परंतु जे वाईट करतात, याहवेहचे मुख त्यांच्याविरुद्ध आहे, त्यांची नावे ते पृथ्वीवरून पुसून टाकतात.

  6. कारण, “जो जीवनावर प्रीती करतो आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे.

  7. त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे.

  8. कारण प्रभूचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. परंतु प्रभूचे मुख जे वाईट करतात त्यांच्याविरुद्ध आहे.”