मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Luke 3:4, »The voice of one crying in the wilderness...«

9 वचने · 252 पैलू

Luke 3:4, »The voice of one crying in the wilderness...« बद्दल वचने

  1. बोलविणार्‍याचा आवाज म्हणतो: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली याहवेहसाठी मार्ग तयार करा; आणि आमच्या परमेश्वरासाठी वाळवंटामध्ये महामार्ग सरळ करा,

  2. प्रत्येक दरी उंच केली जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल; खडबडीत जमीन सपाट होईल, खडकाळ जागा सखल भूप्रदेश करण्यात येईल.

  3. आणि याहवेहचे गौरव प्रगट होईल, आणि सर्व लोक ते एकत्र पाहतील. कारण याहवेहच्या मुखाने हे बोलले आहे.”

  4. तो हाच आहे ज्याच्याबद्दल संदेष्टा यशायाह बोलला होता: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”

  5. “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”

  6. यशायाह संदेष्ट्याच्या शब्दांच्या पुस्तकात लिहिले आहे: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.

  7. प्रत्येक दरी भरून जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी समान होतील, वाकड्या वाटा सरळ होतील, खडतर रस्ते सुरळीत होतील.

  8. आणि सर्व लोक परमेश्वराचे तारण पाहतील.’ ”

  9. यशायाह संदेष्ट्याच्या शब्दात योहानाने उत्तर दिले, मी अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी आहे, जी म्हणते, “ ‘प्रभूचा मार्ग सरळ करा.’ ”