Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Matthew 27:9, »And they took the thirty pieces of silver...«
Matthew 27:9, »And they took the thirty pieces of silver...« बद्दल वचने
मी म्हणालो, “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझे वेतन द्या; पण तुम्हाला वाटत नसेल तर देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला चांदीची तीस नाणी दिली.
मग याहवेहने मला सांगितले, “ही नाणी कुंभारापुढे फेकून दे,” त्यांनी माझ्यासाठी किती भारी मोल ठरविले! मग मी ती चांदीची तीस नाणी घेतली व ती याहवेहच्या भवनातील कुंभारापुढे फेकली.
हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले,
आणि प्रभूने मला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला.”