Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Romans 9:33, »Behold, I lay in Zion a stumbling-stone...«
Romans 9:33, »Behold, I lay in Zion a stumbling-stone...« बद्दल वचने
जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच आता कोनशिला झाला आहे;
इस्राएल आणि यहूदीया या दोघांसाठी; ते एक पवित्रस्थान असतील, लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक, ज्यामुळे ते पडतील. आणि यरुशलेमच्या लोकांसाठी तो एक सापळा आणि पाश होईल.
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी सीयोनमध्ये एक दगड ठेवतो, एक परीक्षा घेतलेला दगड, खात्रीपूर्वक पायासाठी मौल्यवान कोनशिला; त्यावर भिस्त ठेवणारा, कधीही भीतीने त्रस्त होत नाही.
असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो ज्यामुळे ते पडतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”
कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”
आता जे तुम्ही विश्वास ठेवता, त्या तुम्हासाठी हा दगड अति मोलवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत, “जो दगड बांधणार्यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.”