मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: John 12:40, »That they should not see with their eyes...«

9 वचने · 252 पैलू

John 12:40, »That they should not see with their eyes...« बद्दल वचने

  1. ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’

  2. या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.”

  3. त्यांच्याविषयी यशायाह संदेष्ट्याची ही भविष्यवाणी पूर्ण होत आहे: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.

  4. यासाठी की, “ते पाहत असले तरी त्यांना काही दिसत नाही, आणि ते ऐकतात तर, परंतु काही समजत नाही; कदाचित ते वळतील आणि त्यांची क्षमा होईल!”

  5. तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिलेले आहे, परंतु दुसर्‍यांना दाखल्याद्वारेच सांगण्यात येईल,” ते यासाठी की, “ ‘ते पाहत असले तरी त्यांना दिसू नये, ते कानांनी ऐकत असले, तरी त्यांना समजू नये.’

  6. “म्हणून परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत आणि त्यांची हृदये कठोर केली होती, म्हणजे त्यांना डोळ्यांनी दिसू नये, किंवा अंतःकरणाने समजू नये, किंवा ते वळू नये—जेणे करून मी त्यांना बरे करेन.”

  7. यशायाहने येशूंचे गौरव पाहिले म्हणून तो त्यांच्याविषयी बोलला.

  8. “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.

  9. या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.’