मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने: Hebrews 10:16, »This is the covenant that I will make...«

7 वचने · 252 पैलू

Hebrews 10:16, »This is the covenant that I will make...« बद्दल वचने

  1. “परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.

  2. कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”

  3. परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार स्थापित करेन तो असा प्रभू जाहीर करतात, त्या वेळेनंतर मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.

  4. कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘प्रभूला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील,

  5. मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”

  6. “मी त्यांच्याबरोबर करार करेन तो असा, प्रभू म्हणतात त्या वेळेनंतर, मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन आणि ते मी त्यांच्या हृदयावर लिहेन.”

  7. मग पुढे ते म्हणतात, “त्यांची पापे व नियमबाह्य कृत्ये यापुढे मी स्मरणार नाही.”