मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने

636 वचने · 252 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या हाताने हे सर्व घडवले नाही काय?’

  2. शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.

  3. त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.”

  4. शौलाला दूर केल्यानंतर, दावीदाला त्यांचा राजा म्हणून नेमले. या दावीदाबद्दल परमेश्वराने साक्ष दिली: ‘माझ्या मनासारखा मनुष्य इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे; माझ्या इच्छेप्रमाणे असणार्‍या प्रत्येक गोष्टी तो करेल.’

  5. परमेश्वराने ते वचन त्यांनी येशूंना मरणातून उठवून आमच्यासाठी म्हणजे त्यांच्या संतानासाठी पूर्ण केले आहे. त्याप्रमाणे दुसर्‍या स्तोत्रसंहितेमध्ये असे लिहिले आहे: “ ‘तू माझा पुत्र आहे आज मी तुझा पिता झालो आहे.’

  6. त्यांना कुजण्याचा अनुभव कधीही येऊ नये म्हणून परमेश्वराने त्यांना मरणातून जिवंत केले. परमेश्वर असे म्हणाले, “ ‘दावीद राजाला पवित्र व निश्चित आशीर्वाद देण्याचे वचन मी दिले होते.’

  7. म्हणून दुसर्‍या एका ठिकाणीही असे लिहिले आहे, “ ‘तू तुझ्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाहीस.’

  8. “ ‘निंदा करणार्‍यांनो, पाहा, विस्मित होऊन नष्ट व्हा, कारण आता मी तुमच्या काळात जे कार्य करणार आहे, त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’”

  9. यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे: “ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ”

  10. “ ‘यानंतर मी पुन्हा येईन आणि दावीदाचे पतन झालेले मंडप पुनर्स्थापित करेन, तिच्या अवशेषांची पुनर्बांधणी करेन, आणि तिची पुनर्स्थापना करेन.

  11. म्हणजे उरलेली मानवजात प्रभूचा शोध करेल, माझे नाव धारण करणारे सर्व गैरयहूदी देखील, ही कार्ये करतात ते प्रभू असे म्हणतात,’

  12. पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ”

  13. त्यांचे एकमेकात एकमत होत नव्हते व पौलाचे शेवटचे निवेदन ऐकल्यावर ते उठून जाऊ लागले: पवित्र आत्म्याद्वारे यशायाह संदेष्ट्याने तुमच्या पूर्वजांना सत्य सांगितले ते असे:

  14. “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.

  15. या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.’

  16. या शुभवार्तेमध्ये परमेश्वराचे नीतिमत्व प्रकट होते व हे नीतिमत्व विश्वासाने प्रथमपासून शेवटपर्यंत विश्वासाद्वारे साध्य होते, कारण असे लिहिले आहे, “नीतिमान विश्वासाने जगेल.”

  17. मग नियमशास्त्र म्हणते: “तुमच्यामुळेच गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे.”

  18. नक्कीच नाही! प्रत्येक मनुष्य लबाड असला तरी परमेश्वर खरेच आहेत. यासंबंधी असे लिहिले आहे: “म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.”

  19. असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही;

  20. समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही.

  21. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.”

  22. “त्यांची मुखे उघड्या थडग्यासारखी आहेत” त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात. “नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते.”

  23. “त्यांची मुखे तर शापाने व कडूपणाने भरलेली आहेत.”

  24. “रक्तपात करावयाला त्यांचे पाय धाव घेतात,

  25. दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,