- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
परंतु, “जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.”
आणि कोणाला पाठविल्यावाचून ते संदेश कसा सांगतील? कारण असे लिखित आहे: “शुभवार्ता आणणार्याचे पाय किती मनोरम आहेत!”
परंतु शुभवार्ता सर्वच इस्राएल लोकांनी स्वीकारली नाही. यशायाह म्हणतो, “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?”
परंतु मी विचारतो: त्यांनी ऐकले नाही का? होय, ऐकले: “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी गेली आहे, कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे.”
मी पुन्हा विचारतो: हे इस्राएली लोकांना कळलेच नाही का? प्रथम मोशे म्हणतो, “जे राष्ट्र नाही त्यांच्याद्वारे मी तुम्हाला ईर्षेस आणेन; ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी तुम्हाला क्रोधास आणेन.”
यशायाह धिटाईने म्हणाला, “ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे; ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले.”
इस्राएलाबद्दल तो म्हणतो, “आज्ञा न पाळणार्या आणि हट्टी लोकांसाठी मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत.”
“प्रभू, त्यांनी तुमच्या संदेष्ट्यांना मारून टाकले आहे, आणि तुमच्या वेद्या फोडल्या आहेत; मी एकटाच उरलो आहे, आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
यावर परमेश्वराचे त्याला काय उत्तर होते? “मी माझ्याकरिता सात हजार लोक राखून ठेवले आहेत आणि ज्यांनी बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत.”
जसे लिहिले आहे: “परमेश्वराने त्यांना धुंदीचा आत्मा दिला आहे, त्यांचे डोळे पाहू शकत नाहीत व कान ऐकू शकत नाहीत, आणि असे आज या दिवसापर्यंत चालले आहे.”
दावीद राजा म्हणाला: “त्यांचा मेज सापळा व पाश, त्यांना अडखळविण्याचा धोंडा आणि प्रतिफळ असा होवो.
त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.”
आणि याप्रकारे सर्व इस्राएलचे तारण होईल. याविषयी लिहिले आहे: “सीयोनातून तारणारा येईल; व तो याकोबाला सर्व अभक्तीपासून वळवेल.
मी त्यांची पापे हरण करेन. आणि त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे.”
“कारण प्रभूचे मन कोण जाणू शकेल? किंवा त्यांचा सल्लागार कोण आहे?”
माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,” असे प्रभू म्हणतात.
त्याउलट: “तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल.”
या आज्ञा आहेत, “तू व्यभिचार करू नको,” “तू खून करू नको,” “तू चोरी करू नको,” “तू लोभ धरू नको,” आणि इतर दुसर्या कोणत्याही आज्ञा असतील तरी, “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,” या एका आज्ञेत सर्व आज्ञा समाविष्ट आहेत.
कारण असे लिहिले आहे: “ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’ ‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ”
कारण ख्रिस्तानेसुद्धा स्वतःला संतुष्ट केले नाही, परंतु असे लिहिले आहे: “तुझा अपमान करणार्याने केलेला अपमान माझ्यावर आला आहे.”
म्हणजे गैरयहूदी लोकांनी परमेश्वराच्या दयेमुळे त्यांचे गौरव करावे. असे लिहिले आहे: “यास्तव गैरयहूदी लोकांमध्ये मी तुमचे स्तवन करेन; व तुमच्या नावाचे गुणगान गाईन.”
आणखी असे म्हटले आहे, “अहो, गैरयहूदीयांनो, तुम्हीही त्यांच्या लोकांसह आनंद करा.”
आणखी पुन्हा, “सर्व गैरयहूदी लोकांनो प्रभूची स्तुती करा; प्रत्येक राष्ट्र त्यांचे गौरव करो.”
आणि यशायाह संदेष्टा म्हणतो, “इशायाचे मूळ उगवेल, व ते राष्ट्रांचा शासक होण्यास उभे राहतील; गैरयहूदीयांच्या आशा त्यांच्यामध्येच आहेत.”
यशायाह म्हणतो: “त्यासंबंधी ज्यांना पूर्वी कधी कोणीही सांगितले नाही, ते पाहतील व ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.”