- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1406–1380 BC
Conquest of Canaan
Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.
या कालखंडातील वचने
- यहोशुआ १९:३१सुमारे इ.स.पू. १४४३
ही नगरे आणि त्यातील गावे आशेरच्या गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती.
- यहोशुआ १९:३२सुमारे इ.स.पू. १४४३
सहावी चिठ्ठी त्यांच्या कुळांनुसार नफताली गोत्राची निघाली.
- यहोशुआ १९:३३सुमारे इ.स.पू. १४४३
ही सीमा हेलेफ आणि साननीमातील मोठ्या एलावृक्षापासून पुढे अदामी-नेकेब आणि यबनेल ते लक्कूम आणि यार्देनपर्यंत समाप्त होते.
- यहोशुआ १९:३४सुमारे इ.स.पू. १४४३
पुढे पश्चिमेकडे अझनोथ ताबोरमधून जाते आणि हुक्कोक येथे निघते. दक्षिणेकडून ती जबुलूनजवळ, पश्चिमेकडून आशेरजवळ आणि पूर्वेकडून यार्देनच्या यहूदीया वतनभागाला जाऊन मिळते.
- यहोशुआ १९:३५सुमारे इ.स.पू. १४४३
तटबंदीची नगरे सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ,
- यहोशुआ १९:३६सुमारे इ.स.पू. १४४३
अदमाह, रामाह, हासोर,
- यहोशुआ १९:३७सुमारे इ.स.पू. १४४३
केदेश, एद्रेई, एन-हासोर,
- यहोशुआ १९:३८सुमारे इ.स.पू. १४४३
इरोन, मिगदल-एल, होरेम, बेथ-अनाथ, व बेथ-शेमेश ही होती. ही सर्व एकोणवीस नगरे आणि त्यांची गावे होती.
- यहोशुआ १९:३९सुमारे इ.स.पू. १४४३
ही नगरे आणि त्यातील गावे नफताली गोत्राच्या कुळाप्रमाणे वतनभाग होती.
- यहोशुआ १९:४०सुमारे इ.स.पू. १४४३
सातवी चिठ्ठी दान गोत्राच्या कुळांनुसार निघाली.
- यहोशुआ १९:४१सुमारे इ.स.पू. १४४३
त्यांच्या वतनभागाची सीमा ही होती: सोराह, एष्टाओल, ईर-शमेश,
- यहोशुआ १९:४२सुमारे इ.स.पू. १४४३
शालब्बीन, अय्यालोन, इथलाह,
- यहोशुआ १९:४३सुमारे इ.स.पू. १४४३
एलोन, तिम्नाह, एक्रोन,
- यहोशुआ १९:४४सुमारे इ.स.पू. १४४३
एल्तेकेह, गिब्बथोन, बालाथ,
- यहोशुआ १९:४५सुमारे इ.स.पू. १४४३
येहूद, बने-बराक, गथ-रिम्मोन,
- यहोशुआ १९:४६सुमारे इ.स.पू. १४४३
मे-यरकोन आणि रक्कोन, याबरोबरच याफोसमोर असलेला प्रदेश.
- यहोशुआ १९:४७सुमारे इ.स.पू. १४४३
(जेव्हा दानच्या गोत्राची सीमा त्यांनी गमावली, तेव्हा त्यांनी जाऊन लेशेम शहरावर हल्ला करून ते हस्तगत केले, तलवारीने त्यांचा नाश केला व तिथे वस्ती केली. लेशेममध्ये ते स्थायिक झाले व त्या शहराला त्यांचा पूर्वज दानचे नाव दिले.)
- यहोशुआ १९:४८सुमारे इ.स.पू. १४४३
ही नगरे आणि त्यातील गावे दानच्या गोत्राच्या कुळांनुसार त्यांचे वतन म्हणून मिळाले.
- यहोशुआ १९:४९सुमारे इ.स.पू. १४४३
जेव्हा त्यांनी त्यांना दिलेल्या भागाची वाटणी करण्याचे संपविले, तेव्हा इस्राएली लोकांनी नूनाचा पुत्र यहोशुआला आपल्या वतनामध्ये वाटा दिला,
- यहोशुआ १९:५०सुमारे इ.स.पू. १४४३
याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह नगर जे यहोशुआने मागितले होते ते त्याला दिले आणि त्याने ते नगर बांधून त्यात वस्ती केली.
- यहोशुआ १९:५१सुमारे इ.स.पू. १४४३
या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले.
- यहोशुआ २०:१सुमारे इ.स.पू. १४४३
तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले:
- यहोशुआ २०:२सुमारे इ.स.पू. १४४३
“इस्राएली लोकांना सांग, मोशेद्वारे तुम्हाला सुचविल्यानुसार आश्रयाची शहरे नेमून द्यावीत.
- यहोशुआ २०:३सुमारे इ.स.पू. १४४३
यासाठी की जर एखाद्याने अकस्मात् आणि अजाणतेने एखाद्या व्यक्तीची हत्या केली, तर त्याने तिथे पळून जावे आणि रक्ताचा सूड घेणार्यापासून आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.
- यहोशुआ २०:४सुमारे इ.स.पू. १४४३
जेव्हा ते या शहरांपैकी एका शहराकडे पळून जातील, तेव्हा त्यांनी त्या शहराच्या वेशीवर उभे राहावे आणि आपली हकिकत त्या शहराच्या वडीलजनांना सांगावी. आणि त्या वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्यांच्या शहरात घ्यावे आणि त्यांच्यामध्ये राहण्यासाठी त्याला जागा द्यावी.