- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1406–1380 BC
Conquest of Canaan
Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.
या कालखंडातील वचने
- यहोशुआ २०:५सुमारे इ.स.पू. १४४३
जर रक्ताचा सूड घेणारा शोध करीत आला तर, वडिलांनी त्या पळून आलेल्या व्यक्तीला त्याच्याकडे स्वाधीन करू नये, कारण त्याने आपल्या शेजार्याचा काही दुष्ट उद्देश नसताना वध केला आहे आणि त्याच्या मनात कोणतीही द्वेषभावना नव्हती.
- यहोशुआ २०:६सुमारे इ.स.पू. १४४३
जोपर्यंत तो सभेसमोर खटल्यासाठी उभा राहत नाही आणि त्यावेळेस तिथे सेवा करीत असलेला महायाजकास मृत्यू येईपर्यंत त्याने त्या शहरात राहावे. त्यानंतर तो व्यक्ती जिथून पळून आला, त्या नगरात स्वतःच्या घरी परत जावे.”
- यहोशुआ २०:७सुमारे इ.स.पू. १४४३
तेव्हा त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातील केदेश; एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम; आणि यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) ही वेगळी केली.
- यहोशुआ २०:८सुमारे इ.स.पू. १४४३
यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली.
- यहोशुआ २०:९सुमारे इ.स.पू. १४४३
त्यांच्यामध्ये राहणारा कोणा इस्राएली किंवा परदेशीयाने नकळतपणे कोणाची हत्या केली असेल, तर त्याने या नेमून दिलेल्या शहरांकडे पळून जावे, यासाठी की मंडळीसमोर खटल्यासाठी उभे राहण्याआधी रक्ताचा सूड घेणार्याकडून तो मारला जाऊ नये.
- यहोशुआ २१:१सुमारे इ.स.पू. १४४३
आता लेवीचे कुटुंबप्रमुख कनानातील शिलोहमध्ये असताना एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या इतर गोत्राच्या कुटुंब प्रमुखांकडे आले
- यहोशुआ २१:२सुमारे इ.स.पू. १४४३
आणि कनानातील शिलोह येथे त्यांना म्हणाले, “याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिली होती की तुम्ही आम्हाला राहण्यासाठी नगरे व आमच्या गुरांसाठी कुरणे द्यावीत.”
- यहोशुआ २१:३सुमारे इ.स.पू. १४४३
तेव्हा याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे, इस्राएली लोकांनी स्वतःच्या वतनभागातून लेवी लोकांना नगरे आणि कुरणे दिली, ती ही:
- यहोशुआ २१:४सुमारे इ.स.पू. १४४३
पहिली चिठ्ठी कोहाथी लोकांच्या कुळांप्रमाणे निघाली. लेवी जे अहरोन याजकाचे वंशज होते त्यांना यहूदाह, शिमओन आणि बिन्यामीन गोत्रांच्या वतनातून तेरा नगरे दिली गेली.
- यहोशुआ २१:५सुमारे इ.स.पू. १४४३
बाकीच्या कोहाथी वंशजांना एफ्राईम, दान व मनश्शेहचा अर्धा वंश या गोत्रांच्या प्रदेशातील दहा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली.
- यहोशुआ २१:६सुमारे इ.स.पू. १४४३
गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार, आशेर, नफताली व बाशानातील मनश्शेहच्या अर्धा वंशाच्या गोत्रातील कुळांच्या वतनातून तेरा नगरे देण्यात आली.
- यहोशुआ २१:७सुमारे इ.स.पू. १४४३
मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांनुसार रऊबेन, गाद आणि जबुलून गोत्रातून बारा नगरे मिळाली.
- यहोशुआ २१:८सुमारे इ.स.पू. १४४३
याहवेहने मोशेद्वारे जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी चिठ्ठ्या टाकून लेवी लोकांना नगरे व त्यांची कुरणे नेमून दिली.
- यहोशुआ २१:९सुमारे इ.स.पू. १४४३
त्यांनी यहूदाह आणि शिमओनच्या गोत्रांना त्यांच्या नावानुसार नगरे दिली.
- यहोशुआ २१:१०सुमारे इ.स.पू. १४४३
अहरोनाचे वंशज जे लेवीच्या गोत्रातील कोहाथी कुळाचे होते, त्यांची चिठ्ठी पहिली निघाली होती. त्यांना जी नगरे मिळाली ती ही:
- यहोशुआ २१:११सुमारे इ.स.पू. १४४३
त्यांना यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) व त्याची सभोवतालची कुरणे दिली. (अर्बा हा अनाकाचा पूर्वज होता.)
- यहोशुआ २१:१२सुमारे इ.स.पू. १४४३
परंतु त्या शहराच्या सभोवतालची शेती आणि गावे यफुन्नेहचा पुत्र कालेबाला त्याचे वतन म्हणून देण्यात आले होते.
- यहोशुआ २१:१३सुमारे इ.स.पू. १४४३
म्हणून अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांनी हेब्रोन (हत्या केलेल्या व्यक्तीसाठी एक आश्रयाचे शहर), लिब्नाह,
- यहोशुआ २१:१४सुमारे इ.स.पू. १४४३
यत्तीर, एशतमोआ,
- यहोशुआ २१:१५सुमारे इ.स.पू. १४४३
होलोन, दबीर,
- यहोशुआ २१:१६सुमारे इ.स.पू. १४४३
एईन, युत्ताह आणि बेथ-शेमेश व त्यांची कुरणे, ही एकूण नऊ नगरे या दोन गोत्रांकडून दिली.
- यहोशुआ २१:१७सुमारे इ.स.पू. १४४३
बिन्यामीनच्या गोत्राकडून त्यांना: गिबोन, गेबा,
- यहोशुआ २१:१८सुमारे इ.स.पू. १४४३
अनाथोथ आणि अलमोन अशी त्यांच्या कुरणांसह चार नगरे दिली.
- यहोशुआ २१:१९सुमारे इ.स.पू. १४४३
अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांच्या कुरणासहित मिळालेल्या नगरांची एकूण संख्या तेरा झाली.
- यहोशुआ २१:२०सुमारे इ.स.पू. १४४३
कोहाथाच्या कुळांतील राहिलेल्या लेव्यांना एफ्राईम गोत्राच्या वतनातून नगरे देण्यात आली: