मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ २१:२१सुमारे इ.स.पू. १४४३

    एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्यांना दिलेली नगरे ही: शेखेम (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) आणि गेजेर,

  2. यहोशुआ २१:२२सुमारे इ.स.पू. १४४३

    किबसाईम आणि बेथ-होरोन ही त्यांच्या कुरणांसह एकूण चार नगरे.

  3. यहोशुआ २१:२३सुमारे इ.स.पू. १४४३

    दानच्या गोत्राकडून त्यांना मिळालेली नगरे ही: एल्तेकेह, गिब्बथोन,

  4. यहोशुआ २१:२४सुमारे इ.स.पू. १४४३

    अय्यालोन व गथ-रिम्मोन; त्यांच्या कुरणासह ही चार नगरे होती.

  5. यहोशुआ २१:२५सुमारे इ.स.पू. १४४३

    मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: तानख व गथ-रिम्मोन त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे.

  6. यहोशुआ २१:२६सुमारे इ.स.पू. १४४३

    ही सर्व एकूण दहा नगरे व त्यांची कुरणे राहिलेल्या कोहाथी कुळाला मिळाली.

  7. यहोशुआ २१:२७सुमारे इ.स.पू. १४४३

    लेवी कुळातील गेर्षोनाच्या गोत्राला: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: बाशानातील गोलान (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) व बीशतेराह त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे देण्यात आली.

  8. यहोशुआ २१:२८सुमारे इ.स.पू. १४४३

    इस्साखारच्या गोत्राकडून: किशोन, दाबरथ,

  9. यहोशुआ २१:२९सुमारे इ.स.पू. १४४३

    यर्मूथ व एन-गन्नीम व त्यांच्या कुरणासह चार नगरे देण्यात आली.

  10. यहोशुआ २१:३०सुमारे इ.स.पू. १४४३

    आशेरच्या गोत्राकडून: मिशाल, अब्दोन,

  11. यहोशुआ २१:३१सुमारे इ.स.पू. १४४३

    हेलकथ व रहोब ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली;

  12. यहोशुआ २१:३२सुमारे इ.स.पू. १४४३

    नफतालीच्या गोत्राकडून: गालीलातील केदेश (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), हम्मोथ-दोर व करतान ही तीन नगरे त्यांच्या कुरणासह देण्यात आली.

  13. यहोशुआ २१:३३सुमारे इ.स.पू. १४४३

    गेर्षोन कुळाच्या वाट्याला तेरा नगरे व त्यांची कुरणे आली.

  14. यहोशुआ २१:३४सुमारे इ.स.पू. १४४३

    मरारी कुळास (बाकीच्या लेवी गोत्राला): जबुलूनच्या गोत्राकडून: योकनाम, करताह,

  15. यहोशुआ २१:३५सुमारे इ.स.पू. १४४३

    दिमनाह व नहलाल ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.

  16. यहोशुआ २१:३६सुमारे इ.स.पू. १४४३

    रऊबेनच्या गोत्राकडून: बेसेर, याहसाह,

  17. यहोशुआ २१:३७सुमारे इ.स.पू. १४४३

    केदेमोथ व मेफाथ ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली.

  18. यहोशुआ २१:३८सुमारे इ.स.पू. १४४३

    गादच्या गोत्राकडून: गिलआद मधील रामोथ (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), महनाईम,

  19. यहोशुआ २१:३९सुमारे इ.स.पू. १४४३

    हेशबोन व याजेर ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.

  20. यहोशुआ २१:४०सुमारे इ.स.पू. १४४३

    लेवीच्या उर्वरित कुळांना, म्हणजे मरारी कुळास एकूण बारा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली.

  21. यहोशुआ २१:४१सुमारे इ.स.पू. १४४३

    इस्राएली लोकांच्या हद्दीत लेवी लोकांची सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची कुरणे होती.

  22. यहोशुआ २१:४२सुमारे इ.स.पू. १४४३

    यातील प्रत्येक नगराच्या सभोवती कुरणे होती. असेच सर्व नगरांचे होते.

  23. यहोशुआ २१:४३सुमारे इ.स.पू. १४४३

    याप्रमाणे याहवेहने इस्राएलाच्या पूर्वजांना जो देश देण्याची शपथ घेतली होती, तो सर्व त्यांना दिला आणि त्यांनी त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती केली.

  24. यहोशुआ २१:४४सुमारे इ.स.पू. १४४३

    याहवेहने त्यांच्या पूर्वजांना शपथ दिल्याप्रमाणे त्यांना सर्वस्वी विसावा दिला. त्यांचा एकही शत्रू त्यांच्यासमोर उभा राहू शकला नाही; याहवेहने इस्राएली लोकांच्या प्रत्येक शत्रूला त्यांच्या हाती दिले.

  25. यहोशुआ २१:४५सुमारे इ.स.पू. १४४३

    याहवेहने इस्राएली लोकांना दिलेली जी चांगली अभिवचने होती त्यातील एकही निष्फळ झाले नाही; त्यातील प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले.